Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांचा खून

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथे घडली. संशयित घटनेनंतर पसार झाला असून, या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिरपोळे (ता. चाळीसगाव) येथील दगडू वामन खैरनार (गढरी) (वय ५२, मूळ रा. मेहुणबारे) यांचा मुलगा जगदीश याने तीन महिन्यांपूर्वी गावातील तरुणीला पळवून नेत प्रेमविवाह केला. याचा राग मुलीच्या भावाला होता. या प्रेम प्रकरणावरून दोन्ही परिवारांमध्ये वादविवाद होऊन भांडणे विकोपाला गेली होती. त्यातून दगडू गढरी व त्यांच्या कुटुंबास दमबाजी देखील झाली होती.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

साऊथ स्टाइल खून

या प्रेमविवाहातून उफाळलेल्या वादाचे रूपांतर खुनात झाले. जगदीशचे वडील दगडू खैरनार हे शुक्रवारी (ता. १६) दुपारी एकच्या सुमारास तिरपोळे येथून मेहुणबारे येथे रेशन घेण्यासाठी आले होते. मेहुणबारेच्या धुळे रस्त्यावरील हायस्कूलसमोर असलेल्या रेशन दुकानातून रेशन घेतल्यानंतर ते बसस्थानकाकडे पायी जात असताना बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून संशयित सचिन राजेंद्र चव्हाण याने मोटारसायकलवर येत त्याच्या हातातील धारदार हत्याराने (धाऱ्या) दगडू खैरनार यांच्या मानेवर वार केला.

या हल्ल्यानंतर तो हत्यार तेथेच टाकून पळून गेला. या घटनेची माहिती नातलगांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दगडू खैरनार हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांची मागील बाजूने मान कापली गेली होती. त्यातून रक्त निघत होते. गढरी यांच्या नातेवाइकांनी त्यांना त्याच स्थितीत मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून खैरनार यांना मृत घोषित केले.

आणखी संशयित ‘रडार’वर

बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून राग धरून संशयित सचिन चव्हाण (रा. मेहुणबारे, ता.चाळीसगाव) याने दगडू खैरनार यांना जीवे ठार मारल्याप्रकरणी दीपक गढरी (रा. मेहुणबारे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन चव्हाणविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड तपास करीत आहेत. या घटनेचा कसून शोध सुरू असून, संशयित सचिन चव्हाणच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या घटनेत आणखी संशयित वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT