Theft  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कासोद्यात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

कासोदा (ता. एरंडोल) : शेतात कापूस वेचण्यासाठी घरातील सर्व शेतात गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरातून रदिवसा दीड लाख रुपये लंपास केले.

साईपार्कमधील रहिवासी भागवत त्र्यंबक चौधरी शुक्रवारी (ता. २५) सकाळी घराला कुलूप लावून पत्नीसह शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, बॅगमधील सात हजारांची रोकड व कापसाचे दोन बोथे, असा एकूण सुमारे एक लाख ५८ हजार ७७० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

भागवत चौधरी सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कासोदा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सहदेव घुले, इम्रान पठाण, समाधान तोंडे, प्रवीण हटकर तपास करीत आहेत.

चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

गावात अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. स्थानिक पोलिसांची कुठलीच भीती चोरट्यांना वाटत नसल्याने दिवसा दीड लाखाची धाडसी चोरी झाली. महिन्यापूर्वीच किराणा दुकानदाराकडे घरफोडी होऊन दोन लाख ४० हजारांची चोरी झाली होती. त्यापूर्वी १६ गाव योजनेतील फिल्टर प्लांटवरून लाखो रुपयांच्या पाण्याच्या मोटारी व इलेक्ट्रीक साहित्य चोरट्यांनी चोरून नेले होते.

यापैकी एकाही चोरीचा अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही. शेत शिवारात भुरट्या चोऱ्या होत आहेत. पोलिसांकडे तक्रार करूनही चोरांचा तपास होत नसल्याने अनेकदा छोट्या-मोठ्या चोरीची अनेक जण पोलिसांत तक्रार देत नाहीत. या भागात वाढलेल्या चोरीच्या घटनांची जिल्हा पोलिस अधीक्षकांनीच गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टरांच्या अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनवर महायुती सरकारची कडक भूमिका; स्वच्छ हस्ताक्षर अनिवार्य करण्याची तयारी, रुग्णसुरक्षेसाठी मोठा निर्णय

Phondeshwar Temple Robbery : धक्कादायक! महाशिवरात्रीला बसवलेले 10 लाखांचे चांदीचे मुकुट 15 दिवसांतच चोरीला; ग्रामदैवताच्या मंदिरात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Nagpur Crime: होळीच्या पूर्वसंध्येला तरुणाचा खून; बहिणीला मेसेज केल्याच्या कारणावरून वाद, दोघे गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण तणावातही सोमवारी सोने, चांदी चढउतार सुरू

‘साध्वी हिल्समध्ये?’ममता कुलकर्णींची छोट्या पडद्यावर एन्ट्री? अभिनेत्रीच्या नव्या लूकवर नेटकऱ्यांचा संताप, Viral Video

SCROLL FOR NEXT