Crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भाऊबंदकीतील क्षुल्लक वादातून काकाने केला पुतण्याचा खून

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : वाडीशेवाळे (ता. पाचोरा) येथील पाटील कुटुंबीयांच्या भाऊबंदकीत किरकोळ कारणावरून खुनाची घटना घडल्याने सारे गाव सुन्न झाले आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी याप्रकरणी प्रथम मारहाणीचा व नंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वाडीशेवाळे येथे प्रल्हाद भोसले व त्यांचा पुतण्या पूनमचंद भोसले यांची बांधाला बांध लागून जमीन आहे. पूनमचंद भोसले यांचा मुलगा किरण याची बैलजोडी रविवारी (ता. २७) दुपारी चारच्या सुमारास प्रल्हाद भोसले यांच्या शेतात शिरली. त्याचा राग येऊन प्रल्हाद भोसलेंनी नात्याने नातू लागत असलेल्या किरण भोसलेच्या पाठीत काठीने वार केला. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पूनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केल्याने त्यांना जबर दुखापत झाली. त्यांना तत्काळ जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

या प्रकरणी किरण भोसले याने आपले चुलत आजोबा प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांच्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपूत यांनी गणेश भोसले यास ताब्यात घेतले व त्यास अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्यास ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. परंतु जळगाव येथे उपचारार्थ दाखल असलेले पनमचंद भोसले यांचा बुधवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सारे गाव सुन्न झाले आहे.

पोलिसांनी गणेश भोसले व प्रल्हाद भोसले यांच्याविरोधात दाखल केलेला मारहाणीचा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात वर्ग केला आहे. या घटनेनंतर वाडीशेवाळे गावात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT