Burglary Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अजय कॉलनीतील घरफोडीत दीड लाखाचा ऐवज लंपास

Crime News : घरमालक आईच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी घरफोडी केल्याचे सकाळी उघडकीस आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहीातील अजय कॉलनीतील निशांत अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १५ हजारांची रोकड, देवांच्या मूर्तीसह एकूण दीड लाखांचा ऐवज लंपास केला. घरमालक आईच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी घरफोडी केल्याचे सकाळी उघडकीस आले. (One half lakh ransom in house burglary in Ajay Colony)

निशांत अपार्टमेंटच्या तळ मजल्यावर दीपाली मंगलेश पांडे पती, दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. पती नोकरीला सुरतला असतात, तर मोठी मुलगी रिद्धी भोपाळला अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. फ्लॅटमध्ये दीपाली पांडे व त्यांची लहान मुलगी राहते.

याच अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर दीपाली यांची आई सुनंदा खानापूरकर राहतात. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी पांडे फ्लॅटला कुलूप लावून आईकडे गेल्या. यादरम्यान चोरट्यांनी फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोख १५ हजार रुपयांसह सोने-चांदीचे शिक्के, देवी-देवतांच्या मूर्ती चोरून नेल्या. (latest marathi news)

देवपूजेला आल्या अन्‌ देवच घेऊन गेले

शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहाच्या सुमारास दीपाली घरात साफसफाई व देवपूजा करण्यासाठी घरी आल्या. त्यावेळी दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. घरात पाहणी केली असता, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.

देवघरातील चांदीच्या मूर्ती, कपाटातील सोने-चांदीचे शिक्के, रोख १५ हजार, असा एकूण एक लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे दिसले. याबाबत दीपाली पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kas Plateau Flower Season : पर्यटकांसाठी मोठी अपडेट! कास पठारावर फुलांचा हंगाम कधीपासून सुरू होणार? यंदा काय असणार खास? वनविभागाची पूर्वतयारी सुरू

Pimpri News : पालखी सोहळा तोंडावर, उपाययोजना कागदावर! कुठे राडारोडा, कुठे अडथळे; महापालिकेने पाहणी करूनही परिस्थिती जैसे थे

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Highway Toll Rule India : वाहनचालकांसाठी खुशखबर ! महामार्गावर टोल नियमात मोठा बदल, खर्च होणार कमी; काय आहे सरकारचा प्लॅन?

कमळी शोधणार सरोजच्या मृत्यूचं सत्य ते जय वाचवणार शरूचा जीव; या आठवड्यात तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT