Sand  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पोलिस उकळताहेत वाळू माफियांकडून खंडण्या! एक शनिपेठचा कलेक्टर, तर दुसरा अधिकाऱ्याचा अंगरक्षक

Jalgaon Crime : साधारण दोन-तीन महिन्यांपूर्वी अमळनेर पोलिस ठाण्यातील व महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:च्या पोलिस ठाण्याची हद्द सोडून चोपडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : ऐरवी एखादा अपघात घडला, तर तो कसा आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाही, यासाठी भांडणारे पोलिस कर्मचारी खंडण्या गोळा करण्यासाठी मात्र संपूर्ण गाव आपली हद्द या नियमाने वाळू व्यवसायिकांकडून पैसा उकळत असल्याचे समोर आले आहे. (Jalgaon Crime Police are demanding to sand mafia extortion)

पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघी पोलिसांनी वाळू वाहतूकदारास केलेल्या बेदम मारहाणीचे वळ अंगावर उमटले असून, एक बोट फ्रॅक्चर झाले आहे. पोलिस अधीक्षक दखल घेतील, म्हणून दोघा मातब्बरांनी राजाश्रय मिळविला असून, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

साधारण दोन-तीन महिन्यांपूर्वी अमळनेर पोलिस ठाण्यातील व महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:च्या पोलिस ठाण्याची हद्द सोडून चोपडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी संबंधिताच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेतली होती. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले होते.

ही घटना ताजी असतानाच असाच एक प्रकार बिलवाडी ते वावडदादरम्यान बुधवारी (ता. १७) घडला आहे. पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोन पोलिसांनी रात्री साडेबाराच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर थांबविले. बोरनार येथील राकेश पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर असल्याने दोघा पोलिसांनी त्याला पैशांची मागणी केली.

मात्र, राकेश याने पैसे नंतर आणून देतो. मी अमूक एका पोलिसाला हप्ता देत होतो. तुम्हाला कसा देऊ, अशी चर्चा झाली. दोघी पोलिस ऐकत नाहीत, म्हणून राकेशने नंतर पैसे आणून देतो, असे सांगत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.

मारहाणीत बोट फ्रॅक्चर

मात्र, आताच पैसे आणून दे यावर ठाम असलेल्या पोलिसांनी शिवीगाळ दमदाटी केल्यावर तुम्ही मोठे बकरे पकडत नाहीत. गरीब ट्रॅक्टरवाल्यांना त्रास देतात, असे बोलताच या दोघी पोलिसांनी त्याला सरकारी काठीने मारहाण केली. या मारहाणीत राकेशच्या डाव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. अंगावर मारहाणीचे वळ उमटले आहेत.

तसेच झोंबाझोंबीत गळ्यातील अडीच ग्रॅमचे पेंडल पडून गहाळ झाले आहे. हा प्रकार एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या म्हसावद दूरक्षेत्राच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, हे दोघी कर्मचारी या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाहीत. एक शनिपेठ पोलिस ठाण्यात, तर दुसरा एक वरिष्ठ अधिकऱ्याचा अंगरक्षक असल्याची चर्चा आहे.

मारहाणीची बोंब उठू नये, म्हणून कलेक्शन करणाऱ्या इतर बड्या पोलिसांनी जखमी तरुणाशी संपर्क करून तक्रार न करण्याबाबत त्याची मनधरणी केली आहे. मात्र, या घटनेची माहिती पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचली असून, त्यांनी मारहाणीच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

राजकीय दबाव तंत्राचा वापर

घडलेला प्रकार पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्याने कारवाई टाळण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील एक राजकीय पदाधिकारी दबाव आणत असल्याची चर्चाही आता पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT