Ramdev Wadi Accident Case esakal
जळगाव

Jalgaon Ramdev Wadi Accident Case: जखमीच्या जबाबातून चौथ्याची ‘एंट्री’! अटकेतील तिघे न्यायालयीन कोठडीत

Accident News : या प्रकरणात आणखी एक कार आणि संशयितांचे मित्र असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापही दुजोरा दिलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Ramdev Wadi Accident Case : रामदेववाडी अपघात प्रकरणात तिघांच्या अटकेनंतर आता या प्रकणात नवीन चौथ्या संशयिताची एंट्री झाली आहे. जखमी अर्णव कौलने पोलिसांना दिलेल्या जबाबातील चौथा संशयित कोण?, त्याचा पोलिस शोध घेणार असून, तिघा संशयितांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात आणखी एक कार आणि संशयितांचे मित्र असल्याच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापही दुजोरा दिलेला नाही. (jalgaon crime Ramdev Wadi Accident Case Entry of fourth man from statement of injured)

जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेववाडीजवळ ७ मेस सुसाट कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुले व भाचा, अशा चौघांचा मृत्यू झाला होता. दाखल गुन्ह्यात पोलिसांनी १७ दिवसांनंतर अखिलेश संजय पवार व अर्णव अभिषेक कौल यांना २३ मेस मुंबईतून ताब्यात घेतले. पाठोपाठ या दोघांचा मित्र ध्रुव नीलेश सोनवणे (रा. गायत्रीनगर, जळगाव) याला शनिवारी (ता. २६) अटक करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिघांना सोमवारी (ता. २७) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

चौथा होता कोण?

जखमी अर्णव कौल याने पोलिसांना जबाब देताना मुकेश सपकाळे नावाच्या तरुणाचा उल्लेख केला होता. आजवर अपघातग्रस्त वाहन अर्णव चालवत असल्याचे व त्याच्यासोबत अखिलेश संजय पवार, ध्रुव सोनवणे असे मित्र होते. मात्र, मुकेश सपकाळेचे नाव न्यायालयात युक्तिवादादरम्यान समोर आले असून, संशयिताने पोलिसांना दिलेला जबाब नेमका काय होता, याची माहिती घेणार असल्याचे तपासाधिकारी संदीप गावित यांनी न्यायालयास सांगितले. (latest marathi news)

‘त्या’ कारची खात्री नाही

घडल्या प्रकरणात आणखी एक कार होती. त्या कारमध्ये आणखी एक बिल्डरपुत्र, एका शिक्षण सम्राटाचा नातू आणि त्यांची मैत्रीण असल्याची माहिती समोर येत असताना, याबाबत अद्यापपर्यंत पोलिसांना कुठलचे पुरावे उपलब्ध होऊ शकले नाहीत. या घटनेशी निगडित सीसीटीव्ही फुटेजची आम्ही पाहणी केली, तसेच चौकशीही झाली आहे. पीडित कुटुंबीयांनी पोलिस तपासावर समाधान व्यक्त केल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

खडसेंचे आंदोलन तात्पुरते स्थगित

दरम्यान, या प्रकरणात पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करीत असून, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मृतांच्या नातलगांसह ग्रामस्थांनी केला होता. या पाश्‍र्वभूमीवर ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी पोलिस महासंचालक रश्‍मी शुक्ला यांना निवेदन देऊन या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत २८ मेस ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंशांवर गेला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. उष्माघाताचा धोका पाहता खडसेंनी हे आंदोलन स्थगित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT