police & sand Transport esakal
जळगाव

Jalgaon Crime: ‘त्या’ निलंबित पोलिसांचे फेरनियुक्तीद्वारे पुनर्वसन! वाळू व्यावसायिकांना मारहाण; पोलिस अधीक्षकांकडून कारवाई मागे

Crime News : पोलिस अधीक्षकांनी त्यांची पुन्हा त्याच जागेवर पुनर्नियुक्ती केल्याने पोलिसदलात चेर्चेला उधाण आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : बेकायदेशीर वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडल्यावर पैसे देण्यास नकार दिल्याने दोन पोलिसांनी वाळूवाल्यास मारहाण करत बोट फ्रॅक्चर केले होते. पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात दोन पोलिसांचे (ता.२२ एप्रिलला) निलंबन केले होते. निलंबनाच्या दिवसांपासून ‘मी पुन्हा येईल’ असा नारा या दोघांनी दिला होता. त्यानुसारच पोलिस अधीक्षकांनी त्यांची पुन्हा त्याच जागेवर पुनर्नियुक्ती केल्याने पोलिसदलात चेर्चेला उधाण आले आहे. (Jalgaon Crime Rehabilitation of suspended cops through redeployment)

गेल्या महिन्यात १७ एप्रिलला मध्यरात्री १२:३० वाजता बिलवाडी फाटा ते वावडदा गावादरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या गाडीसारखीच दिसणाऱ्या पांढऱ्या जीपमधून आलेल्या दोघा पोलिसांनी राकेश पाटील नावाच्या वाळू व्यावसायिकाचे ट्रॅक्टर अडवून पैशांची मागणी केली. त्यातून वाद उद्‌भवून दोघा पोलिसांनी सरकारी दांडक्याने राकेश पाटील यांस मारहाण केली होती.

त्याने तक्रार देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांतील ‘कलेक्टर’ टोळीने ही तक्रार होऊ दिली नाही. घटनेची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यापर्यंत पोहचली. चौकशीअंती प्रकरणात सत्यता आढळून आल्याने आज डॉ. रेड्डी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी राहुल पाटील व डिवायएसपी कार्यालयातील सचिन साळुंखे अशा दोघांचे निलंबनाचे आदेश पारित केले हेाते. (latest marathi news)

पुन्हा येईलचा नारा

दोघांचे निलंबन उलटून पंधरा दिवस उलटत नाही तोवर दोघांना पुन्हा त्याच जागेवर पुन्हा नियुक्ती देण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून राजकिय वरदहस्त असलेली मंडळी प्रयत्नशील होती. त्या अनुषंगाने ‘मी, पुन्हा येईल’ असे म्हणत दोन्ही पोलिसांनी त्याच जागी नियुक्ती मिळवल्याने निलंबन आणि पुनर्नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे.

मग निलंबन कशासाठी?

पोलिस खाते शिस्त आणि शास्तीवर आधारीत आहे. जळगाव पोलिस दलात मात्र, शिस्तीला बासनात गुंडाळल्याची अवस्था असून गेल्या महिन्यात पोलिस अधीक्षकांनी कसुरी अहवालावरुन निलबंन केलेल्या दहा कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती बहाल करण्यात आली.

तर, वाळूवाल्यांशी वादाच्या प्रकरणात या दोन्ही कर्मचाऱ्यांना त्याच जागी पुनर्नियुक्ती मिळाल्याने, पोलिस अधीक्षकांनाच कसुरीवर कारवाईचा अधिकार नसल्याने नेत्यांच्या मांडीला मांडी लावणाऱ्या पोलिसाची जिल्‍हापोलिस दलात चलती असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT