Vehicles seized by Bhusawal city police after rescuing animals. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कत्तलीसाठी जाणाऱ्या 31 जनावरांची सुटका; 2 वाहने ताब्यात; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News : पोलिसांच्या या कामगिरीमुळे मुक्या प्राण्यांचे जीव वाचले. त्यामुळे पशुप्रेमींनी आभार मानले आहेत

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप रणदीवे यांना तापी नदीपात्रातील पुलावरून भुसावळ मार्गे पुढे अवैधरीत्या गायींची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक रणदिवे यांनी शहरातील यावल नाका येथे फॉरेस्ट चौकीसमोरील रस्त्यावर गस्तिपथक नेमले होते.

पथकातील कर्मचाऱ्यांना दोन वाहनांचा संशय आल्याने तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये २८ गायी आणि ३ वासरे अशी एकूण ३१ जनावरे ताब्यात घेतली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मुक्या प्राण्यांचे जीव वाचले. त्यामुळे पशुप्रेमींनी आभार मानले आहेत. (Jalgaon Crime Rescue of 31 animals going to slaughter news)

भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांना सोमवारी (ता. २९) आयशर टेम्पो (क्रमांक पीबी ०२, डी.डब्ल्यू ७८४९) व ट्रक (क्रमांक पीबी ३५, क्यू ९२३०) या वाहनांमधून तापी नदीपात्रातील पुलावरून भुसावळ मार्गे पुढे कुठेतरी जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.

त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास यावल नाका येथील फॉरेस्ट चौकीसमोरील रोडलगत गस्तीपथके तैनात केली. त्याच वेळी गस्ती पथकांच्या नजरेस या क्रमांकाची वाहने पडली असता वाहनांना तातडीने बाजूला थांबऊन वाहनांची तपासणी केली. (Latest Marathi News)

दोन्ही वाहनांमध्ये २८ गायी व ३ वासरे असे एकूण ३१ जनावरे आढळून आली. यातील वासरांना दोरीच्या सहाय्याने निर्दयी व क्रूरपणे घट्ट अन्नपाण्याशिवाय बांधून ठेवले होते. या प्रकरणी निर्दयीपणे जनावरांची वाहतूक केल्या प्रकरणी शुभम मोहन रुमकर (वय २७, रा. साकरी) यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक कलबोरसिंग अवतारसिंग (वय ४०, रा.सकोपुरा, ता. जि. अमृतसर, पंजाब), अमनदिपसिंग गौरबच्चनसिंग (वय ३८, रा. सटयाली, ता. जि. गुरूदासपूर, पंजाब), सुखविंदरसिंग मोतासिंग (वय ४०, रा. वरियन, ता. जि. गुरुदासपूर, पंजाब), यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT