Burglary esakal
जळगाव

Jalgaon Crime : निवृत्त सहाय्यक फैाजदाराला मुलाकडे जाणं पडलं महागात! बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह लांबविले दागिने

Latest Crime News : सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार चंद्रकांत बडगुजर पत्नीसह गेल्या १४ सप्टेंबरला रावेर येथे शिक्षक असलेल्या मुलाकडे (पंकज बडगुजर) गेलेले होते अन...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : पत्नीसह रावेर येथे मुलाकडे गेलेले सेवानिवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत माधवराव बडगुजर (वय ६७, रा. दादावाडी, जळगाव) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख सात हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी येथील तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Burglars broke into locked house stole jewelry along with cash)

सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार चंद्रकांत बडगुजर पत्नीसह गेल्या १४ सप्टेंबरला रावेर येथे शिक्षक असलेल्या मुलाकडे (पंकज बडगुजर) गेलेले होते. मात्र, जळगाव येथील त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून रोख सात हजार रुपये, ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनपोत, १० हजार रुपये किमतीच्या गणपतीची चांदीच्या दोन मूर्ती, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के, जोडवे असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

शेजारी राहणाऱ्या महिलेने गुरुवारी (ता.२६) बडगुजर यांच्याशी संपर्क साधून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर बडगुजर कुटुंबीय घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटून ते जिन्याखाली पडलेले दिसले. (latest marathi news)

तसेच घरामधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते, तर कपाटात ठेवलेली रोकड व सोने-चांदीचे दागिने दिसले नाहीत. याप्रकरणी त्यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबातबचा पुढील तपास पोलिस नाईक धनराज पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT