Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : असोद्यात पिस्तुलीच्या धाकावर लूट; सट्टापेढी चालकाला पिस्तूल लावून 70 हजारांना लुटले

Jalgaon Crime : असोदा गावात तोंडाला रूमाल बांधलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी पिस्तूल लावून सट्टापेढी चालकाची ७० हजारांची रोकड लांबविली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : असोदा गावात तोंडाला रूमाल बांधलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी पिस्तूल लावून सट्टापेढी चालकाची ७० हजारांची रोकड लांबविली. शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांत कुठलीही नोंद नसली तरी घडलेल्या प्रकाराने तालुका पोलिसांनी धाव घेत संशयितांचा शोध सुरू केला आहे. ()

असोदा (ता. जळगाव) गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील भागात आडोशाला तोंडाला रूमाल बांधून ट्रिपलसीट दुचाकीवर आलेल्या या भामट्यांनी सट्टापेढी चालकाला पिस्तूल लावून त्याच्या जवळील ७० हजारांची रोकड लांबविली. एक ते दीड वर्षापूर्वीही अशीच घटना या परिसरात घडली आहे.

अवैध धंदा चालवला जात असल्याने तो तक्रार करणारच नाही, याची खात्री बाळगून संशयितांतर्फे ही लूटमार केली गेल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. परिसरातील ग्रामस्थांना विचारणा केल्यावर घडलेला प्रकार त्यांनी सांगितला.

ज्याची लूट करण्यात आली होती, त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याने दिलेल्या माहिती आणि वर्णनानुसार संशयितांचा शोध सुरू झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी बघण्यास सुरवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT