Nitin Pathrod esakal
जळगाव

Jalgaon Crime News: भुसावळच्या दुहेरी खुनातील सहाव्या संशयिताला अटक; बाजारपेठ पोलिसांनी वरणगावातून घेतले ताब्यात

Crime News : या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : येथील माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा जुन्या वादातून गोळीबार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापूर्वी पाच जणांना अटक केली आहे. सहाव्या संशयित आरोपीला वरणगाव येथून अटक करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले. (Jalgaon Crime Sixth suspect arrested in Bhusawal double murder)

या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीकडून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शनिवारी (ता.२२) दुपारी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांना गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी वरणगाव शहरातील साक्री फाटा येथे संशयित आरोपी नितीन पथरोड याला सापळा रचून अटक केली. त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. दरम्यान, या खुनातील मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार आहे. (latest marathi news)

पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, जावेद शाह, सचिन चौधरी आदी कर्मचाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder : आयुष कोमकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या, कोण आहे गणेश काळे, कसं संपवलं?

Latest Marathi News Live Update : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवांकडून ६ वैद्यकीय मोबाईल युनिट्सना हिरवा झेंडा

Girish Mahajan : जळगाव महापालिकेत यंदा भाजप 'रेकॉर्ड ब्रेक' कामगिरी करणार; विरोधी पक्षात कोणी उरले नाही: गिरीश महाजन

Water Supply Cut: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १८ तास पाणीबाणी, कधी अन् कुठे?

Dhule News : धुळे ग्रामीणला मोठा दिलासा! अतिवृष्टीग्रस्त १६ हजार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी १० हजारांचे विशेष पॅकेज मंजूर

SCROLL FOR NEXT