Crime sakal
जळगाव

Jalgaon Crime : ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; संशयितास अटक

Jalgaon Crime : महिलेच्या घरात घुसून तिला ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २४ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिला ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता.९) पहाटे दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेली २४ वर्षीय गृहिणी घरात झोपलेली असताना संशयित घरात शिरला व त्याने महिलेचे तोंड दाबून तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ( suspect arrested for assaulting woman by threatening to kill her )

पीडितेने घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पहाटे दोनच्या सुमारास संशयित मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी (वय ४०, रा. हरीविठ्ठल नगर) याने ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा जबाब नोंदविल्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. विठ्ठल पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT