Mobile theft esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शाहूनगरातून दहा मोबाईल लंपास; हौसिंग सोसायटीतील विद्यार्थी चोरट्यांचे टार्गेट

Crime News : रविवारी (ता. २८) पहाटे पाचच्या सुमारास चोरट्यांनी याचाच गैरफायदा घेत त्यांच्या खोलीतून विद्यार्थ्यांचे ७० हजार रुपयांचे १० मोबाईल चोरून नेले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील शाहूनगरमधील सहयोग क्रिटीकलजवळील हौसिंग सोसायटीतील भूषण राजेंद्र ठाकरे (रा. वटार, ता. चोपडा) याच्यासह शिक्षण घेणारे मित्र आणि इतर विद्यार्थ्यांच्या खोलीतून दहा मोबाईल चोरीला गेले आहेत. (Jalgaon Crime Ten mobile phones looted from Shahunagar)

प्रचंड तापमानामुळे रात्री खोल्यांची दारे उघडी करून विद्यार्थी झोपतात. रविवारी (ता. २८) पहाटे पाचच्या सुमारास चोरट्यांनी याचाच गैरफायदा घेत त्यांच्या खोलीतून विद्यार्थ्यांचे ७० हजार रुपयांचे १० मोबाईल चोरून नेले. दिवस उजाडल्यावर जो-तो आपला मोबाईल शोधू लागल्याने रुमवर चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

अखेर विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहाला दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार सुनील पाटील तपास करीत आहेत. शाहूनगर संमिश्र लोकवस्तीचा परिसर असून, मध्यवर्ती ठिकाण असल्याने दाटीवाटीचा आहे. या परिसरात रात्री उशिरापर्यंत टार्गेट पोरे कट्ट्यावर बसून असतात. त्यात नशेसाठी काहीही करण्यास तयार असलेल्या भुरट्यांचाही समावेश आहे. (Latest Marathi News)

गस्तच दुरापास्त

शाहूनगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी ड्रग्ज पेडरला अटक झाली. त्याने दहा लाखांचे ड्रग्स पडकी शाळेच्या इमारतीतू काढून दिले. याच शाळेला लागून एका बाजूला झोपडपट्टी, तर दुसऱ्या बाजूला हौसींग सोसायटी आहे. शाहूनगरातील गल्ली बोळापासून ते मुख्य रस्त्यांवर रात्रभर भुरटे चोर घोळका करून असतात. पोलिसांचा चुकूनही फेरफटका परिसरात होत नसल्याने रहिवाशांना त्यांचा प्रचंड त्रास आहे. रात्रभर सिगारेट-गुटख्याचे कट्टे सुरू असल्याने या चोरट्यांचे बऱ्यापैकी फावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT