Stolen house. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोपड्यातील श्रीकृष्ण कॉलनीत धाडसी चोरी; दोघांना पाठलाग करून पोलिसांनी पकडले

Jalgaon Crime : शहरातील जुना शिरपूर रस्त्यावरील श्रीकृष्ण कॉलनी भागातील नवल ओंकार पाटील (वय ७५, मुळ रा. वाळकी, ता. चोपडा) यांच्या राहत्या घरासमोर मंगळवारी (ता. २८) रात्री दोनच्या सुमारास एका चारचाकी वाहनात पाच दरोडेखोर आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील जुना शिरपूर रस्त्यावरील श्रीकृष्ण कॉलनी भागातील नवल ओंकार पाटील (वय ७५, मुळ रा. वाळकी, ता. चोपडा) यांच्या राहत्या घरासमोर मंगळवारी (ता. २८) रात्री दोनच्या सुमारास एका चारचाकी वाहनात पाच दरोडेखोर आले. त्यांनी घराचे कंपाउंड व दरवाज्याचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. पाच दरोडेखोरांपैकी काळे दाढी असलेले २५ ते ३० वयोगटातील दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोठा कोयत्याच्या धाक दाखवून नवल पाटील यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व ‘तुम्ही आवाज केला, तर मारून टाकू’, अशी धमकी दिली. (theft in Sri Krishna Colony in Chopda )

त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले नऊ हजार पाचशे रुपये, स्टेट बँकेचे पासबुक, आधार कार्ड पिशवीसह जबरदस्तीने चोरून नेले. घरात चोर आल्याचे आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आले. नंतर कुणीतरी शहर पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि चोरांना पळताभुई झाली. पोलिसांनी एकास जागेवर, तर धरणगाव रोडवर चोरट्यांचा पाठलाग करताना एक, असे पाचपैकी दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

अन्य तीन जण पसार झाले. कौसर मुसा खाटीक (वय२७) व देवेंद्र युवराज काकडे (३०, दोन्ही रा. दोंडाईचा) यांना अटक करून चोपडा न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, सुलतान पिंजारी, राजा कुरेशी व तिसरा संशयित पोलिसांच्या हातातून निसटून फरार झाले आहेत.

चोरट्यांनी चोरी करताना मोठा कोयता, एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून घरफोडीसाठी आले होते. सापडलेल्या दोन्ही संशयितांच्या ताब्यातून साडेनऊ हजारपैकी साडेतीन हजार, दोन मोबाईल, दोन कोयते व चार चाकी वाहन, असे मुद्देमाल जप्त केला आहे. हे शंयित सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender : 2025 मधील RBI चे सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय! EMI आणि कर्जात काय स्वस्त झालं? एका क्लिकवर वाचा

Kolhapur Wagapur Arch : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर लाँगमार्च

Latest Marathi News Live Update: वाल्मिक कराडच्या जामिनावरील सुनावणी १६ तारखेला

IPL 2026 Auction: कॅमेरून ग्रीनने लिलावात 'भाव' वाढावा म्हणून खेळली मोठी खेळी... आता तर फ्रँचायझींमध्ये रंगणार जोरदार चुरस

Kolhapur Football Training : कोल्हापुरच्या फुटबॉलपटूंना मोठा दिलासा; निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीचा मार्ग अखेर मोकळा

SCROLL FOR NEXT