Jailed esakal
जळगाव

Jalgaon Crime: मानसिक त्रासाला कंटाळून मुलानं उचललं टोकाचं पाऊल! संशयितांना पोलिस कोठडी! घुमावल बुद्रूक येथील घटनेतील तिघांना अटक

Crime News : याप्रकरणी अटकेतील संशयितांना आज सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : पूर्ववैमनस्यातून वारंवार दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून व जीवे मारण्याच्या धमकीमुळे तालुक्यातील घुमावल बुद्रूक येथील रहिवासी मंगेश रेवानंद पाटील (वय १७) या मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी अटकेतील संशयितांना आज सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. (Tired of mental distress child took extreme step Suspects in police custody)

महेंद्र एकनाथ पाटील (वय ३८), मनोज पंढरीनाथ पाटील (४२) व पवन मगन पाटील (२९, सर्व रा. घुमावल बुद्रूक ता. चोपडा) अशी पोलिस देण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मंगेशने आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी (ता.१६) पहाटे घडली.

याबाबतची फिर्याद मंगेशचे काका वसंत प्रेमराज पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी कालच अटक केली होती. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री

Latest Marathi News Live Update : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती

2026 मध्ये OTT वर धुमाकूळ घालायला येताय नव्या सीरिज, प्रेम, ड्रामा, थ्रिल आणि अ‍ॅक्शनने भरलेली ही यादी, एकदा नक्की वाचा!

Pune Municipal Election : धोकादायक २१ जागांनी वाढविली चिंता; २०१७ मध्ये एक हजारापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या जागांवर लक्ष

Kidney Transplant : आईच्या मूत्रपिंडदानातून तरुणाला नवे आयुष्य

SCROLL FOR NEXT