Assistant Superintendent of Police Annapurna Singh, Assistant Inspector of Police Nilesh Wagh, Sub-Inspector of Police Mainuddin Syed and police personnel were arrested along with the suspects in the theft case. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : फैजपूरला चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक; जिल्ह्यात 7 ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघड

Jalgaon Crime : चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन संशयितांची चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील विविध सात ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथे दाखल चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन संशयितांची चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील विविध सात ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले. या संशयितांकडून ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. येथे २५ मे व १८ जूनला चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. अनुक्रमे तीन लाख तीन हजार रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने तसेच १ लाख २८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती. (Two arrested in Faizpur theft case revealed that 7 places were stolen in district )

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिरपूर येथेही चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात असलेले संशयित व ‘सीसीटीव्ही’ कॅमेत कैद असलेले येथील चोरीच्या गुन्ह्यातील संशयित यांचे वर्णन सारखे दिसत असल्याने या संशयितांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. राजेंद्रसिंग उर्फ राजन प्रितमसिंग बरनाल( वय २६) व ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला (वय २३, दोघे रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत.

या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यात फैजपूर येथील २, रावेर येथील २, यावल येथील २, अडावद येथील १ अशा एकूण ७ गुन्ह्यांची कबुली या संशयितांनी दिली. दरम्यान, पथकाने इंदूर येथे जाऊन सातही गुन्ह्यातील तब्बल ३ लाख ५५ हजार रुपयांचा सोने चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यात ७० ग्राम सोने व १०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, पोलिस उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद, पोलिस कर्मचारी रवींद्र मोरे, अनिल पाटील, मोती पवार, विकास सोनवणे, भूषण ठाकरे या पथकाने हा तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Stomach Bloating: पोटफुगीची समस्या कशी कमी करावी? डॉक्टरांनी सांगितले 5 प्रभावी उपाय

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि करू नये? जाणून घ्या नियम

Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत

Shubhanshu Shukla : अवकाशात खूप भिती वाटते, पण....गगनयान मिशनबद्दल काय बोलले अंतराळवीर शुभांशू शुक्ला? पाहा व्हिडिओ.

SCROLL FOR NEXT