A team of the local crime branch along with the criminal Yogesh Kolhe. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : एमपीडीएसाठी वाँटेड गुन्हेगाराला पुण्यात बेड्या

Crime News : योगेश ऊर्फ ऋतिक दिगंबर कोल्हे (वय ३२, रा. असोदा, ता. जळगाव) असे फरारी संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एमपीडीए (स्थानबद्धता)च्या कारवाईचा प्रस्ताव तयार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुका पोलिस ठाण्यासह मध्य प्रदेशातील नेपानगर येथील गंभीर गुन्ह्यातील फरारी अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपरी चिंचवड येथून सापळा रचून अटक केली. योगेश ऊर्फ ऋतिक दिगंबर कोल्हे (वय ३२, रा. असोदा, ता. जळगाव) असे फरारी संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एमपीडीए (स्थानबद्धता)च्या कारवाईचा प्रस्ताव तयार आहे. (crime news)

कोल्हेविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दरोडा व मारहाणीचे गुन्हे, नेपानगर येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. एमपीडीए कारवाईसाठी तो हवा होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, ईश्वर पाटील यांना संशयिताच्या शोधावर पाठविले होते.

संशयित भामटा योगेश केाल्हे पुण्यात वास्तव्यास असल्याचे समोर आले. पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील थेरगाव भागात पोलिसांनी सापळा रचला. तो थेरगाव येथे पहाटे नातेवाइकांकडे येत असताना, पावसात पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेतले. संशयिताला तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT