While inspecting damaged papaya crop, former Guardian Minister Dr. Farmer Sanjay Patil along with Satish Patil and farmers in the area
While inspecting damaged papaya crop, former Guardian Minister Dr. Farmer Sanjay Patil along with Satish Patil and farmers in the area esakal
जळगाव

Jalgaon News : अवकाळीमुळे करंजी बुद्रूक शिवारात शेतीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वादळी व गारपीट पावसामुळे पारोळा व बहादरपूर मंडळासह परिसरातील तब्बल १७ ते १८ खेड्यांमध्ये गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले. परिसरातील नुकसानग्रस्त भागाची महसूल विभागाने सरसकट पंचनामे करावे अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील यांनी तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन केली. (Jalgaon Crop loss in Karanji Budruk Shivar due to unseasonal rain)

आज मंगळवारी (ता.५) डॉ सतीश पाटील यांनी करंजी बुद्रूक येथील शेतकरी संजय हिंमतराव पाटील यांच्या शेताची पाहणी केली. त्यांच्या पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तब्बल २१०० झाडे जमीन दोस्त झाली आहेत.

त्यामुळे या शेतकऱ्याचा पंचनामा होऊन त्यांना शासकीय मदत मिळावी तसेच पारोळा व बहादरपुर मंडळासह तालुक्यात झालेल्या गारपीट व बेमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे करून सरसकट पंचनामा करावा अशी मागणी केली.

करंजी बुद्रूक येथे पपई शिवाय परिसरातील गहू, मका, ज्वारी ,बाजरी या रब्बी पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेले आहे. नगदी पीक कपाशीने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातात तोंडाचा आलेला घास हिरावला .

शासन स्तरावर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी या भागातील विलास रोकडे, ज्ञानेश्वर रोकडे, तुकाराम रोकडे, शेखर पाटील, जितेंद्र माळी, आशिष पाटील ,संदीप पाटील, दत्तू माळी, नंदलाल रोकडे युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, प्रज्वल रोकडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. करंजी बुद्रूक येथील शेतकरी संजय पाटील यांनी डॉ. पाटील यांच्याकडे अवकाळीमुळे झालेल्या पिकांच्या व्यथा मांडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT