Shendodi of Malkapur available in the market here. esakal
जळगाव

Jalgaon News : मलकापूरची शेंदोडी पारोळ्यातील भाजी बाजारात ग्राहकांची मागणी

Jalgaon : ऐरवी पावसाळ्यात शेतात पिकविली जाणारी शेंदोडी उन्हाळ्यात मिळणे दुर्मीळच असते.

संजय पाटील

Jalgaon News : ऐरवी पावसाळ्यात शेतात पिकविली जाणारी शेंदोडी उन्हाळ्यात मिळणे दुर्मीळच असते. चवळी टाकून तयार करण्यात आलेली शेंदोडीची भाजी खायला पोषक व रुचकर असते. मात्र, ती पावसाळ्याच्या चारही महिन्यांत मिळते. याकरिता पारोळा शहरातील ग्राहकांनी उन्हाळ्यातदेखील ती मिळावी, अशी मागणी भाजीपाला विक्रेते गोपाल भिका महाजन यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना उन्हाळ्यातदेखील शेंदोडीचा आस्वाद घेता यावा, यासाठी मलकापूर येथून शेंदोर्डी विकत घेत ती पारोळ्यातील बाजारात विक्रीसाठी आणण्यात आली आहे. ()

या शेंदोंर्डीचा आस्वाद शहरातील नागरिक घेत आहेत. खानदेशात शेतातील आंतरपीक म्हणून चवळी, उडीद, मूग, हरभरा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरेच शेतकरी शेतात ज्वारी पिकाबरोबर आंतरपीक म्हणून शेंदोडीची लागवड करतात. खायला कडवट व गोडवट असलेली शेंदोडीची भाजी तिचे महत्व खानदेशात अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ही शेंदोडी उन्हाळ्यात मिळणे नवलच मानावे लागेल.

दरम्यान, सदर शेंदोडी ही बाजारपेठेत भाजीपाला विक्रेते भिका महाजन व गोपाल महाजन यांच्याकडे असल्याने सर्व बाजारपेठेत सदर शेंदोंडी लक्ष वेधत आहे. दरम्यान, तिचे एक किलोचे भाव ६० ते ८० रुपये किलो असून, ग्राहकांची मोठी मागणी शेंदोडीला प्राप्त झाली आहे. साधारणपणे दररोज १५ ते २० किलो शेंदोंर्डी विकली जात असल्याचे भाजीपाला विक्रेते यांनी सांगितले. दरम्यान, दैनंदिन भाजीपाला ऐन लग्नसराई स्थिर आहे. त्यामुळे महिला वर्ग भाजीपाल्याच्या बाजारभावाबाबत समाधानी आहेत. (latest marathi news)

रांगडा कांदा भाव खाणार

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा रोष व्यक्त होईल, याची जाणीव ठेवत सरकारने निर्यात बंदी हटविली आहे. त्यामुळे कांद्याच्या भाव वाढ होण्याची शक्यता असून, दैनंदिन वापरात असलेला रांगडा कांदा याचा भाव वाढणार असल्याने आज आठवडे बाजारात कांदा खरेदीसाठी अनेकांनी घाई केली.

''दरम्यान, घाऊक बाजारात पन्नास रुपयाला दोन किलो कांद्याचे भाव होते. बाजारात दाखल झालेली शेंदोडी खायला रुचकर, पोषक व चविष्ट आहे. दैनंदिन भाजीपाला बरोबर शेंदोडीची भाजी खायला मिळाल्याने भाजीपाला विक्रेतेांची ग्राहकविषयी आस्था कौतुकास पात्र आहे. मलकापूरची शेंदोडी उन्हाळ्यात खायला मिळाली. कुटुंबाला खूपच आनंद झाला.''-अमृता मराठे, गृहिणी, पारोळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT