Cyber Crime esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : ऑनलाईन फसवणूक; दिल्लीचे ठग अटकेत सायबर पोलिसांची कामगिरी

Cyber Crime : सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने दिल्लीतून दोन संशयितांना अटक केली असून, तांत्रिक पुराव्यांची जुळवणी केल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने दिल्लीतून दोन संशयितांना अटक केली असून, तांत्रिक पुराव्यांची जुळवणी केल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. जळगाव शहरातील जयनगरमधील रहिवासी तथा व्यापारी हेमेंद्र राजेंद्र शर्मा (वय ५६) यांनी फेसबुकवर राम इन्व्हेस्टमेंट ॲकॅडमी नावाने जाहिरात पाहिली होती. ( Cyber ​​Police arresting thugs of Delhi online fraud )

त्या जाहिरातीच्या लिंकवर त्यांनी क्लीक केले असता, त्यांना संशयितांनी व्हॅट्सॲप ग्रुपवर जॉईन करण्यात आले. त्या ग्रुपवर गुरुराम आणि दिया नावाच्या ॲडमिनकडून ऑनलाईन लिंक पाठवली. लिंकवर गेल्यावर शेअर मार्केट संबंधित क्लास घेण्यासाठी सांगण्यात आले.

अशी केली फसवणूक

संशयितांनी गुंतवणूक दुप्पट तिप्पट करण्याचे प्रलोभन देत ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिलदरम्यान शर्मा यांचा विश्वास संपादन करून शेअर्स खरेदी विक्रीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्या नावाने इन्स्टिट्यूशनल अकाउंट तयार करण्यास सांगून विविध चार्जेसच्या नावाखाली एकूण ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा गंडा घालण्यात आला. विविध बँक खात्यावरून ही रक्कम वळती करून घेतली होती. या प्रकरणी २७ एप्रिलला गुन्हा दाखल झाला होता.

सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सहाय्यक फौजदार वसंत बेलदार, प्रदीप चौधरी, श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, नितीन भालेराव, प्रशांत साळी यांना दिल्लीला रवाना केले होते. पथकाने दिल्लीत मुक्काम ठोकत तांत्रिक माहितीच्या अधारे सापळा रचला. त्यानुसार दिल्लीच्या पटेलनगर भागातून रणजितसिंग मदनकुमार (वय ४३, रा. जहांगीरपुरा, दिल्ली), प्रवीणकुमार बीरेंद्र शाही (वय ४४, रा. द्वारका सेक्टर-१९, दक्षिण दिल्ली) यांना अटक केली.

त्यांच्याकडून पंजाब नॅशनल बँकेच्या कागदपत्रात दिलेला व लिंक असलेला मोबाईल, विविध बँकांचे एटीएम कार्ड ताब्यात घेतली. संशयितांना गुरुवारी (ता. २७) जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT