Discharge in progress as all the gates of Aner Dam are opened. esakal
जळगाव

Jalgaon Dam Water Storage : अनेर धरणाचे सर्व दरवाजे उघडले! धरण 58 टक्के भरले

Jalgaon News : अनेर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणाचा साठा वाढत चालला असून, धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अनेर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणाचा साठा वाढत चालला असून, धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडण्यात आल्याने सध्या ३७ हजार ६०० क्यूसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेर नदीला मोठा पूर आला. सद्यस्थितीत धरणात सायंकाळी पाचपर्यंत २१२.७० मीटर इतका साठा असून, आवक वाढत आहे. (All gates of Aner Dam opened)

दरम्यान, दोन्ही काठांवरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला. धरणाची पाण्याची पूर्ण पातळी २१६.४० मीटर इतकी आहे. धरण पात्रात सध्या २८.८२ दशलक्ष घनमीटर इतका साठा असून, तो एकूण साठ्याच्या ५८ टक्के इतका आहे.

धरण पात्रात ९२.७० दशलक्ष घनमीटर इतका पाण्याचा साठा होऊ शकतो. १५ ऑगस्टपर्यंत धरणाचे सर्व दरवाजे उघडे राहणार आहेत. धरण पात्रात रविवारी (ता. २८) १० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आजही पाऊस सुरूच आहे. (latest marathi news)

सातपुड्याच्या डोंगर कपारीतून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येऊ लागले असून, आजपर्यंत धरणाच्या बॅक वॉटर परिसरात ३६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

"धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारपासून पाऊस सुरू असल्याने धरणात साठा वाढला. त्यामुळे अनेर धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी."- पी. बी. पाटील, उपविभागीय अधिकारी, अनेर मध्यम प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT