drowning  esakal
जळगाव

Jalgaon News : ‘गिरणा’त पोहायला गेलेल्या बालकाचा मृत्यू; एकाला वाचविण्यात यश

Jalgaon : आठ वर्षांचा बालक पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वरखेडे (ता.चाळीसगाव) गावात आज घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : उन्हाळ्याच्या सुट्‍ट्‍या लागल्याने व गिरणा नदीत आवर्तनाचे पाणी असल्याने पोहायला गेलेला आठ वर्षांचा बालक पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वरखेडे (ता.चाळीसगाव) गावात आज घडली. ‘माझा बाळाला आणून द्या हो’ असे सांगत डोके जमिनीवर आपटणाऱ्या बालकाच्या आईचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. दरम्यान, या घटनेत एका लहान मुलाला वाचविण्यात यश आले. (Jalgaon Death of child who went swimming in Girna river )

याबाबत माहिती अशी, वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील गिरणा नदीपात्रात सध्या पाणी आहे. या पाण्यात गावातील पाच ते सहा लहान मुले मंगळवारी (ता. २८) सकाळी सव्वादहाच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. नदीपात्रात ही मुले गुडघाभर पाण्यात पोहत होती. यातील यश राजेंद्र पवार (वय ८) हा बालक पोहता पोहता थोडा पुढे गेला असता, नदीपात्रातील खड्ड्यात गेल्याने पाण्याचा प्रवाहात ओढला गेला. त्याचवेळी आणखीन एक मुलगा वाहून जात होता.

मात्र, त्याला दुसऱ्या एका मुलाने धरल्याने तो बचावला. यश मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. या प्रकारानंतर मुलांनी गावात पळ काढला. हा प्रकार नदीवर धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलेने पाहिला व तिने गावात पळत जाऊन मुलगा नदीत वाहून गेल्याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ नदीपात्राकडे धाव घेत मुलाचा शोध घेतला असता, यशचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर वरखेडे खुर्द शिवारात सापडला.

एकुलता एक मुलगा

मृत यश पवार हा तिसरीत शिकत होता. त्याच्या आई- वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याचे आई वडील शेतमजूर असून सकाळी ते कामावर जाण्यापूर्वी मुलाला भेटले आणि त्यानंतर अर्ध्या तासात मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आईला आपल्या बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच तिने एकच हंबरडा फोडला. या घटनेने अवघे वरखेडे गाव सुन्न झाले.

वाळू माफियांमुळे गेला बळी

गिरणा नदीपात्रात वाळूची चोरी करणाऱ्या वाळू माफियांनी ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे केले आहे. नदीपात्रात केवळ गुडघाभर पाण्यात पोहत असताना यश हा बालक थोडा पुढे गेला असता, नदीपात्रात वाळू उपसा केलेले खड्डे त्याच्या लक्षात आले नाही. या खड्ड्यात तो पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला. वरखेडे शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याने संपूर्ण नदीपात्रात खड्डेच खड्डे झाले आहेत. या खड्‍ड्यांमुळेच बालकाचे प्राण गेल्याने या भागातून वाळूची चोरी करणाऱ्यांवरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT