अमळनेर ः मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत शहरात शुक्रवारी (ता. ११) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Development works will be launched in Amalner tomorrow in presence of Chief Minister)
शहरातील प्रताप महाविद्यालयात दुपारी बाराला होणाऱ्या या मेळाव्याला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून यासाठी सर्व महिला, भगिनींना सन्मानाने घरपोच पत्र पाठवून निमंत्रण देण्यात आले आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून अमळनेर मतदासंघांत एकही महिला वंचित राहू नये तसेच अर्ज भरताना त्यांची फिरफिर व आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शहरात नगरपरिषद तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी सुविधा केंद्र उभारले होते. (latest marathi news)
त्यामुळे मतदारसंघात ९९ टक्के भगिनींचे अर्ज भरले जाऊन त्या पात्र देखील ठरल्या आहेत. त्यांच्या खात्यावर तीन ते चार हफ्त्यांचे पैसे पडल्याने त्या आर्थिक सक्षम होऊन ग्रामीण भागात आर्थिक उलाढाल वाढली असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. या लाभार्थी महिला भगिनींचा सन्मान होऊन त्यांच्याशी तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांशी हितगूज व्हावे तसेच त्यांच्या इतर काही अडचणी असतील तर त्या देखील समजून घ्याव्यात यासाठीच मुख्यमंत्री व दोन्ही उपुख्यमंत्री स्वतः येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनांचा होणार शुभारंभ
तापी प्रकल्प पाडळसरे अंतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक १ ते ५ मध्ये २५ हजार ६५७ हेक्टर जमिन सिंचनासाठी पाईपद्वारा पाणीपुरवठा वितरण नेटवर्कचे पंप हाऊससह बांधकाम, महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत अमळनेर शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा योजना, केंद्रीय मार्ग निधी प्रकल्प, हायब्रीड अन्युटी अंतर्गत अनेक रस्त्यांची कामे अशा सुमारे १ हजार ७६०.४० कोटीच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात येणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.