Devendra Fadnavis esakal
जळगाव

Devendra Fadnavis : यंदा मतदान भाजपसाठी नव्हे; तर भारतासाठी करावे : देवेंद्र फडणवीस

Jalgaon News : पंतप्रधान मोदींच्या गाडीतील डब्यात सामान्यांना बसायला जागा आहे. तर विरोधकांकडे सगळेच इंजिन आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : पंतप्रधान मोदींच्या गाडीतील डब्यात सामान्यांना बसायला जागा आहे. तर विरोधकांकडे सगळेच इंजिन आहे. त्यांच्याकडे डबेच नाहीत. त्यामुळे एकीकडे मोदींच्या रुपाने विकास पुरुष आहे तर दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली २४ पक्षांची खिचडी आहे. त्यामुळे यंदा मतदान भाजपसाठी नव्हे; तर भारतासाठी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Jalgaon Devendra Fadnavis)

भुसावळ येथील मातृभमी चौकात रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, रक्षा खडसे यांनी दहा वर्षात गावोगावी संपर्क ठेवला. मोदींचा विकास जिल्ह्यापर्यंत आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक विकास कामे केली, त्याच बरोबर देश सुरक्षित कसा राहील यासाठी अनेक उपाययोजना केल्या.

जगात देशाला मानाचे स्थान मिळवून दिले. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला लाभ मिळवून देणाऱ्या योजना राबविल्या. बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा लोनच्या माध्यमातून विनातारण व विना गॅरेंटर दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. (latest marathi news)

महिलांच्या सन्मानाच्या योजना राबवल्या, असेही फडणवीस यांनी नमूद केले. रक्षा खडसे यांचा १३ मेस वाढदिवस आहे. त्याच दिवशी मतदान आहे. आपल्या बहिणीला एक लाख मताधिक्याचे गिफ्ट द्यावे, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, माजी मंत्री दिलीप कांबळे.

माजी आमदार चैनसुख संचेती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, राजेंद्र चौधरी यांची भाषणे झाली. प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत विविध विषयावरील देखावे

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

Shocking! माथेफिरू तरुणाने चाव्या हिसकावल्या, प्रवाशांनी भरलेली बस सुरू केली अन्...; अनेकांना चिरडले

SCROLL FOR NEXT