District Government Medical Colleges esakal
जळगाव

Jalgaon News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डायलेसीस मशीन बंद; 6 महिन्यांपासून गरीब रुग्णांचे हाल

Jalgaon : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डायलेसीस मशीन सहा महिन्यांपासून बंद आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डायलेसीस मशीन सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत असून, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे सलीम इनामदार यांनी केला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात संपूर्ण अनागोंदी कारभार सुरू आहे. रुग्णांची कोणतीच दखल घेण्यात येत नाही. (Dialysis machine in Govt Medical College stopped )

सफेद कावीळ, व दुर्धर आजारांच्या रुग्णांसाठी डायलेसीस मशीन आहे. मात्र, ते सहा महिन्यांपासून बंद आहे. सफेद काविळमुळे किडनी निकामी झालेल्या रुग्णाला डायलेसीस करणे अत्यंत गरजेचे असते. खासगी रुग्णालयात डायलेसीस करणे गरीब रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे अनेक जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येतात. मात्र, ते मशीन बंद आहे. (latest marathi news)

त्याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता, ते व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. याबाबात आपण स्वत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांना भेटलो. त्यांना समस्या सांगितली. मशीन दुरुस्त केले. मात्र, त्याचे बिल अदा केलेले नाही, असे डीन यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा मशीन बंद पडले असून, मागील बिल न मिळाल्याने दुरुस्त करणारा येत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ मशीन दुरुस्त करावे, अन्यथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इनामदार यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT