Jalgaon Municipal Corporation  esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिका प्रभारी आयुक्त, मक्तेदारात वाद

Jalgaon News : दहा दिवसांपासून बिलांच्या फाइल टेबलावरच ठेवून त्याचा निपटारा न केल्याने महापालिकेत मक्तेदार व प्रभारी आयुक्तांमध्ये शाब्दीक चकमक झाली.

सकाळ वृत्तसेवा,

Jalgaon News : दहा दिवसांपासून बिलांच्या फाइल टेबलावरच ठेवून त्याचा निपटारा न केल्याने महापालिकेत मक्तेदार व प्रभारी आयुक्तांमध्ये शाब्दीक चकमक झाली. महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या आयुक्तपदाचा प्रभारी पदभार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे शासनाकडून देण्यात आला आहे. (Jalgaon Municipality News)

मात्र एक आठवडा उलटूनही फाइलींचा निपटारा होत नसल्याच्या मक्तेदारांकडून तक्रारी आहेत. याबाबत मक्तेदार सूरज नारखेडे यांनी शुक्रवारी (ता.२९) प्रभारी आयुक्त पल्लवी भागवत यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठांकडे आपली तक्रार का करू नये? असे म्हणताच प्रभारी आयुक्त भागवत आणि मक्तेदार नारखेडे यांच्यात जोरदार शाब्दीक वाद झाला.

मक्तेदार नारखेडे यांनी यासंदर्भात नगरविकास विभागाच्या अवर सचिवांकडे भ्रमणध्वणीवर संपर्क साधून तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. मक्तेदार नारखेडे यांनी सांगितले, की आपण बिलांच्या फाइलसाठी वारंवार भेटलो आहोत. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. (latest marathi news)

महापालिकेत गेले आठ दिवस केवळ प्रशिक्षण सेंटरच सुरू आहे. त्यामुळे कोणतीही कामे होत नाहीत. त्यामुळे आपण संताप व्यक्त करून वरिष्ठांना भ्रमणध्वनी वरून याची माहिती दिली आहे. सक्षम अधिकाऱ्याकडे पदभार सोपवावा, अशी मागणीही केली आहे.

"महापालिकेत मार्च अखेरची कामे सुरु आहेत. त्यामुळे शासकीय निधीच्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे लागत आहे. निधी व्यपगत होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. माझ्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभाराबरोबरच प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी आहे. नियमानुसार शासकीय कामांना प्राधान्य देत आहे. सर्वच मक्तेदारांच्या फाइल प्रलंबित असून मार्च अखेरची कामे झाल्यानंतर या फाइल काढण्यात येतील."- पल्लवी भागवत, प्रभारी आयुक्त, महापालिका जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT