Lumpy Virus News esakal
जळगाव

Lumpy Disease : जळगाव जिल्हा ठरला ‘Hotspot'; 122 जनावरे मृत्यूमुखी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत जनावरांमध्ये लम्पी स्किन डीसीज आढळला आहे. त्यामुळे एक हजार ८०० पशूधन बाधित झाले असून, आतापर्यंत १२२ जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. लम्पी स्किन आजारामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू जळगाव जिल्ह्यात झाले आहेत.

पशूसंवर्धन विभागातर्फे प्रत्येक तालुक्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत दोन लाख २५ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. (Jalgaon District Becomes Hotspot of Lumpy Disease 122 animals died Jalgaon Latest Marathi News)

लम्पी आजाराचा प्रसार बाह्य कीटकांद्वारे (डास, माश्‍या, गोचीड आदी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर, तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी ग्रामपंचायतींतर्फे पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करण्यात येत आहे. विषाणुजन्य आणि सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

लम्पी स्किन प्रतिबंधासाठी उपाययोजना

-जिल्ह्यातील जनावरांचे सार्वजनिक बाजार बंद

-इतर राज्यामधून आंतरराज्य सीमेवरून पशुधनाची होणारी वाहतूक बंद

-पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे आंतरराज्य सीमेवरील चेकनाक्यांवर कसून तपासणी

-चराईचे क्षेत्र, पाणवठे बंद

-पशुधन एकत्र येतील, असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद काही काळासाठी बंद ठेवले आहेत.

अशी लावा विल्हेवाट

ग्रामपंचायतीनी पशुधन मृत झाल्यास त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ४ बाय ८ फूट आकाराचा खड्डा करावा. ही व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर शक्य नसल्यास गटविकासाधिकाऱ्यांमार्फत पंचायत समिती बांधकाम विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे करण्याची व्यवस्था करावी. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने मृत पशुधनाची विल्हेवाट लावावी.

आजार लपविल्यास कारवाई

सर्व खासगी पदविकाधारकांनी किंवा पशुपालकांनी लम्पी स्किन आजाराची माहिती शासकीय पशुवैद्ययकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी आजाराचे उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसारच करावेत. खासगी पदविकाधारकांनी लम्पी स्किन आजारावर परस्पर उपचार करू नयेत, त्याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे नोंद करावी, अन्यथा उपचार करताना जनावरे हातातून जात असल्याचे दिसत असल्यानंतर शासकीय रुग्णालयाकडे आणणल्यास संबंधित खासगी डॉक्टरांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.

आकडे बोलतात...

* लम्पी आजाराने बाधित गुरे : ५,१८०

* एकूण मृत गुरे : १२२

* जिल्ह्यातील गुरे : ५ लाख ५० हजार

* आतापर्यंत लसीकरण झालेली गुरे : २ लाख २५ हजार

* प्रत्येक तालुक्यात कार्यरत टीम: ६

"आतापर्यंत जिल्ह्यात लम्पी आजाराने १२२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २ लाख २५ हजार गुरांना लसीकरण झाले आहे. साडेपाच लाख गुरांना लसीकरणाचे उद्दिष्ठ आहे. ते लवकरच पूर्ण होईल. पशुपालकांनी गुरांना लम्पीची लागण झाल्याचे लक्षात येताच पशूसंवर्धपन विभागाला कळवून गुरांवर उपचार करून घ्यावेत." - डॉ. श्‍यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंर्वधन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT