corona corona
जळगाव

जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा; तीन महिन्यात मृत्युची नोंद कमी

गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा २५२० झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेतील (second wave) तीव्रतेत गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत कमी मृत्युची (death) नोंद शुक्रवारी झाली. दिवसभरात अवघ्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला. शिवाय, नव्या बाधितांची (new corona positive) संख्याही दीडशेच्या टप्प्यात म्हणजे १६९ नोंदली गेल्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

(jalgaon district corona death numbers after three months low)

जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरवातीपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. लॉकडाऊन (lockdown) व त्याला नागरिकांना दिलेल्या प्रतिसादाचे हे सकारात्मक परिणाम आहेत. नव्याने बाधितांची संख्या कमी होत असून त्यामुळे सक्रिय रुग्णही घटले आहेत.शुक्रवारी तब्बल साडे आठ हजार चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी केवळ १६९ नवे रुग्ण समोर आले. एकूण रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार ५०० झाली आहे. तर २७८ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३० हजार ५५४ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा २५२० झाला आहे.


९ तालुक्यांत दहाच्या आत
संसर्ग कमी होत असल्याची चिन्हे ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. जिल्ह्यातील १५ पैकी ९ तालुक्यांमध्ये शुक्रवारी १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. पैकी धरणगाव व अमळनेर या दोन तालुक्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.


असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात २० रुग्ण आढळून आले, तर ३१ बरे झाले. जळगाव ग्रामीण २, भुसावळ ११, चोपडा ६, पाचोरा ७, भडगाव ५, यावल २०, एरंडोल १, जामनेर २३, रावेर १२, पारोळा १२, चाळीसगाव ४२, मुक्ताईनगर ३, बोदवड ४.
(jalgaon district corona death numbers after three months low)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

SCROLL FOR NEXT