Ajit Pawar esakal
जळगाव

Jalgaon News : अजित पवार गटाचा आज जिल्हा मेळावा

Jalgaon : राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्ष यांची महायुती आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्ष यांची महायुती आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघ महायुतीत भाजपच्या वाट्याला गेले असून त्यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचा जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांचा मेळावा शनिवारी (ता.३०) होणार आहे. (Jalgaon District meeting of Ajit Pawar group today)

जळगाव येथील टेलिफोन ऑफीसमागील लेवा भवनात हा मेळावा होईल. सकाळी अकरा वाजता या मेळाव्याचे आयोजन केले आहे. पक्षाचे नेते राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच पदाधिकाऱ्यांचे विचार ऐकून घेण्यात येणार आहेत. बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख उमेश नेमाडे यांनी केले आहे. (latest marathi news)

शिदें गटाची उद्या तालुका बैठक

जळगाव : महायुतीत मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाची तालुका बैठक रविवारी (ता.३१) होणार आहे. सायंकाळी चार वाजता मायादेवी नगरातील रोटरी हॉलमध्ये ही बैठक होईल. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मित्र पक्ष भाजपच्या जळगाव लोकसभा उमेदवाराच्या प्रचाराबाबत दिशा ठरविणार आहे. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tajmahal Case: ताजमहलची ऐतिहासिक केस ४२ वर्षांनंतर संपली! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आज फ्री एंट्री

IPL 2026 News: अरे त्या, दीपक चहर, शार्दूल ठाकूरला पैसे द्या अन् घरी पाठवा! Mumbai Indians वर दिग्गजाचा पारा चढला; म्हणाले...

Heritage Travel: कुठे आहे महाभारतातील लाक्षागृह? उलगडणार ४००० वर्षे जुन्या संस्कृतीचे रहस्य! 'हेरिटेज ट्रेल'मधून युवकांना मिळणार रोजगार!

Skincare: उसाच्या चिपाडांतून आता उजळणार चेहरा! शास्त्रज्ञांनी शोधली स्वस्त पद्धत; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार भर!

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

SCROLL FOR NEXT