Jalgaon District Planning Committee roads Works crore 
जळगाव

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ५१० कोटी रुपयांची कामे मार्गी

उपलब्ध निधीच्या ९५ टक्के खर्च : ग्रामीण रस्ते, अंगणवाड्या साठवण बंधाऱ्यांची कामे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल ९५.२५ टक्के निधी खर्च झाला आहे. यात ५३६ कोटी ५ लाख ५९ हजार रूपये निधीची तरतूद करण्यात आली होती. यातील ५१० कोटी ५९ लाख ६५ हजार रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. ग्रामीण रस्ते, फर्निचरसह ग्रामपंचायत इमारती, अंगणवाड्या, स्मशानभूमी बांधकाम, सुशोभीकरण, साठवण बंधारे, नावीन्यपूर्ण कामे, ट्रान्सफॉर्मर्ससह विजेची अन्य कामे, जि. प. शाळांना संरक्षक भिंती उभारणे, सौर उर्जा कामे आदींना प्राधान्य देण्यात आले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन मंडळाने अचूकपणे नियोजन केल्याने लागोपाठ दुसऱ्या वर्षी ९० टक्क्यांपेक्षा जास्त निधीचा वापर करण्यात आला आहे. तर उरलेल्या निधीतील कामांना मंजुरी मिळाली असली तरी बीडीएस प्रणालीतील त्रुटी आणि संथपणामुळे निधी मिळाला नाही. यंदाचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीतून यंदा देखील कामांचे चांगले नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेचे सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती (एससीपी) आणि आदिवासी उपाययोजना (टीएसपी) हे तीन भाग असतात.

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात सर्वसाधारण वर्गवारीसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद होती. यापैकी ३७४ कोटी ७८ लक्ष ७३ हजार रूपयांच्या निधीची कामे मार्गी लागली असून याची उपलब्ध निधीशी टक्केवारी ९३.७० टक्के इतकी आहे. अनुसूचित जाती-जमाती अर्थात एससीपी या वर्गवारीसाठी ९१ कोटी ५९ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातील सर्वच्या सर्व ९१ कोटी ५९ लक्ष रुपयांचा निधी खर्च झाला आहे. याचे प्रमाण १०० टक्के इतके आहे. आदिवासी उपाययोजना या वर्गवारीसाठी ४४ कोटी ४६ लक्ष ५१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असता यातील ४४ कोटी २१ लक्ष, ९२ हजार रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT