Dog sterilization centre (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : कुत्रा निर्बिजीकरण कामाचा मक्ता बंद; गैरव्यवहारप्रकरणी गुन्ह्यानंतर कारवाई

Jalgaon : शहरातील मोकाट कुत्रे निर्बिजीकरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशान्वये नंदुरबारच्या संबंधित मक्तेदार एजन्सीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील मोकाट कुत्रे निर्बिजीकरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशान्वये नंदुरबारच्या संबंधित मक्तेदार एजन्सीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानेही आता या मक्त्याला स्थगिती दिली आहे.

महापालिकेतर्फे शहरातील मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याच्या कामाचा मक्ता नंदुरबार येथील नवसमाज निर्माण बहुउद्देशिय संस्थेला देण्यात आला होता. (Jalgaon Dog sterilization centre off)

कुत्र्यांना अँटी रेबीज लसीकरण करून बेल्ट किंवा कॉलर चीप व कानावर व्ही नॉच करून त्या कुत्र्यांना जेथून पकडले त्या ठिकाणी परत सोडण्याचे काम मक्तेदाराला देण्यात आले होते. मात्र, नागरिकांकडून मक्तेदार अटी शर्ती नुसार काम करत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या नुसार जिल्हा पशू संवर्धन विभागाचे उपयुक्त यांनी चौकशी केली व त्यानुसार अहवाल सादर केला.

त्यात म्हटले आहे की, याठिकाणी आवशक सुविधा नाही तसेच निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांच्या संख्येत देखील तफावत आढळून आली आहे. त्यानुसार पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त अनिल शिंदे यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे मक्तेदारा विरूध्द फिर्याद दाखल केली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी मक्तेदारास काम स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT