Unmesh Patil
Unmesh Patil esakal
जळगाव

Jalgaon News : महाजनांना झाले नाही, ते मशालवाल्यांना काय होणार? डॉ. राधेश्‍याम चौधरी यांची उन्मेश पाटील यांच्यावर टीका

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सध्या चिंधी सापडलेल्या उंदरासारखी अवस्था झालेल्या या महाशयाने भाजपमध्ये असताना, काही दिवे लावले नाहीत आणि पक्ष सोडल्यावर ज्यांनी मोठे केले, त्यांच्यावरच ते उलटले आहेत. भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांना जो झाला नाही, तो मशालवाल्यांना काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून लोकसभा निवडणूकप्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांनी माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर टीका केली. (Jalgaon Dr. Radheshyam Choudhary criticizes Unmesh Patil)

उन्मेश पाटील यांनी भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत बेताल वक्तव्य केल्यानंतर डॉ. चौधरी यांनी गुरुवारी भाजप जीएम फाउंडेशन-भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

‘भाजपयुमो’चे जळगाव जिल्हा प्रभारी अरविंद देशमुख, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, महानगर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अश्विन सोनवणे व सुनील खडके, सरचिटणीस अमित भाटीया आणि महेश जोशी, डॉ. क्षीतिज भालेराव, प्रकाश बालाणी, भूषण भोळे, राहुल पाटील, महानगरचे प्रसिद्धिप्रमुख मुविकोराज कोल्हे, जिल्ह्याचे प्रसिद्धिप्रमुख जितेंद्र पाटील आदी या वेळी उपस्थित होते. (latest marathi news)

पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली नाही, म्हणून लगेच दुसऱ्या पक्षात उडी घेणाऱ्या माजी खासदाराला सध्या शेतकऱ्यांविषयी खूपच कळवळा दाटून आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर महिन्यातच जिल्हा बँक चुकली होती, तर तेव्हाच खासदारांनी आवाज का उठविला नाही? गटसचिवांना न्याय का मिळवून दिला नाही.

असे प्रश्न डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केले. याशिवाय शेतकऱ्यांविषयीचे त्यांचे सध्याचे प्रेम हे बेगडी प्रेम असून, गिरणेवरील बलून बंधाऱ्यांना पर्यावरणची मान्यता दिली नाही, म्हणून शिवसेनेच्या नेत्यांवर त्या वेळी टीका करणारे आज त्यांना साहेबाची उपमा देत आहेत. अशा दुटप्पी वागण्यावरही डॉ. चौधरी यांनी टीका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT