banana ( file photo ) esakal
जळगाव

Jalgaon Banana News : रोज साडेतीनशे ट्रक केळी उत्तरेत; तरीही व्यापारी म्हणतात उठाव नाही

Jalgaon Banana : व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मिलिंद टोके : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Banana News : व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. एकीकडे सावदा परिसरातून दररोज तीनशे ते साडेतीनशे ट्रक भरून केळी उत्तरेत जात आहे, दुसरीकडे उत्तरेतील व्यापारी उठाव नसल्याचे सांगतात. परिणामी, दिवसागणिक भावात कमालीची घट होत आहे. जळगाव व बऱ्हाणपूर जिल्ह्यातून जवळपास सहाशे गाड्या केळी रोज रवाना होत असताना ही केळी जाते कुठे, असाही संतप्त प्रश्नही शेतकरी विचारू लागले आहेत. ( Due to arbitrary management of traders banana producing farmers are in trouble)

सावद्याच्या केळी पट्ट्यात उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर असंख्य ट्रक माल कापणी होत असताना नफ्याचा ताळमेळ जमत नसल्याने केळी उत्पादक पुरते हैराण झाले आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुलतानी व आसमानी संकटांना तोंड देत आपली केळी जगवतात. मात्र, ऐन कापणीच्या वेळी व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादकांची अडवणूक केली जाते. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

मिळेल त्या भावात मिळेल त्या व्यापाऱ्याकडून सध्या केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळी कापत आहे. रासायनिक खतांचा भाव, मजुरी यामुळे शेतकऱ्यांचा ताळमेळ बसत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. चिनावल परिसरात केळी घेता का कोणी? अशी वेळ अक्षरश: शेतकऱ्यांवर आली आहे.

केळीच्या लागवडीसाठी नांगरटी, मशागत, शेणखत, प्रतिरोप १६ रुपये खर्च व नंतर रासायनिक खते या सर्वांचा विचार करता त्यासाठी कमीत कमी एक हजार रुपयांवर भाव मिळाला तर शेतकऱ्यांना परवडते. मात्र आता त्यावर येणारे ‘व्हायरस’ अन्य रोगाचा विचार केला असता हा भाव देखील परवडत नाही. त्यातच ज्यावेळी कापणी नसते त्यावेळेस भाव थोडेफार बरे असतात. (latest marathi news)

मात्र आता केळी उष्णतेमुळे जास्त प्रमाणात कापणीवर आल्याने चांगल्या प्रतीचा माल जो मागच्या वर्षी दोन हजारांवर मागितला जात होता. ते व्यापारी अक्षरश: चारशे ते पाचशे रुपये भावाने मागत आहे. मात्र किरकोळ बाजारात केळी महागात विकली जात आहे. या तफावतीवर कोणाचाही अंकुश नाही. ही एक प्रकारची थट्टाच आहे.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करते तसेच बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा दावा करते. आज रोजी सावदा येथून केळीची सुमारे ३५० ट्रक दररोज रवाना होतात मग जर व्यापारी म्हणतात केळीला मागणी नाही तर हे ट्रक कोठे जातात, हा प्रश्न पडतो. म्हणूनच शेतकऱ्याचा कोणीच वाली नाही हे मात्र खरे.

‘एक्सपोर्ट’ क्वालिटीच्या मालाची निर्यात

रावेर, सावदामधून काही माल कंटेनरद्वारे तर काही ट्रकच्या साहाय्याने उत्तर भारतात पाठविला जातो. सद्यस्थितीत केळीची घड भरून ट्रकद्वारे विक्री आणि घडाच्या फण्या करून एक्सपोर्ट आणि क्वालिटीचा माल बाहेर पाठविण्यात येत आहे. साधारणपणे खानदेशातील बराच माल हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या भागात पाठविला जातो. गेल्या वर्षी लागवड झालेली केळी ऊन पडू लागल्याने अगोदरच काढणे गरजेचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT