महामार्गावरील कामामुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य. esakal
जळगाव

Jalgaon News : महामार्गावर उठतात धुळीचे लोट; पहूरजवळ चौपदरीकरणाचे काम संथगतीने

Jalgaon News : पाचोरा मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या महामार्गावर धुळीचेच साम्राज्य आहे. या धुळीचा पादचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पहूर : जळगाव - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. तसेच पाचोरा मार्गावरील रस्त्याचेही काम सुरू असल्याने सध्या महामार्गावर धुळीचेच साम्राज्य आहे. या धुळीचा पादचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Pachora Marg highway is currently covered in dust)

पहूरवरून जामनेर, शेंदुर्णी येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता जात असतात. त्याचप्रमाणे पहूर हे एक मोठे बाजारपेठ आहे. दहा ते बारा खेडे गावाला लागून आहे.

सकाळपासून मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते व चौफुलीचे गाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची वर्दळ असते. अशातच पहूर येथे महामार्गावरील पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. (Latest Marathi News)

उन्हाळ्याचे दिवस कोरडा फफुटा प्रवासी, विद्यार्थी, गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही.

मागील पंधरवड्यात मारुती एस क्रॉस ही कार नवीन पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी उलटली होती. या महामार्गाचे व पुलाचे काम गतीने व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chief Justice India: सरन्यायाधिशांचे वादग्रस्त वक्तव्य अन् सारवासारव..

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

SCROLL FOR NEXT