Water accumulated in Jagdish Patil's field and corn kernels washed away in water. esakal
जळगाव

Jalgaon Heavy Rain Crop Damage : परतीच्या पावसामुळे खरीप नेस्तनाबूत! शेतात कापून ठेवलेले मक्याचे कणीस, सोयाबीन गेले वाहून

Latest Jalgaon Rain News : काढणीला आलेले सोयाबीन, मक्याला शेतातच कोंब फुटले आहेत. कापूसही झाडांवरच भिजल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांद्रा (ता. पाचोरा) : गेल्या चार-पाच दिवसांपासून उत्तराच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावला आहे. पिके नेस्तनाबूद झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काढणीला आलेले सोयाबीन, मक्याला शेतातच कोंब फुटले आहेत. कापूसही झाडांवरच भिजल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. (Due to return rain Kharif destroyed)

मजूर मिळत नसल्यामुळे अनेकांची कापूस वेचणी बाकी आहे. पावसामुळे कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस झालेल्या मुसळधारेमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले होते. त्यात काढून ठेवलेली मक्याची कणसे अक्षरशः वाहून गेली. पावसामुळे लिंबू, सीताफळ, पेरू, केळी यांसारख्या फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

धान्य मार्केटही पावसामुळे बंद आहे. धान्याला अपेक्षित भावही नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कपाशीबाबतही अशीच परिस्थिती आहे. यंदा उत्पादनातही मोठी घट निर्माण झाली आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला आशादायक चित्र असताना, पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. (latest marathi news)

पिंपळगाव परिसरात पावसाचे थैमान

पिंपळगाव हरेश्‍वर : पिंपळगावसह परिसरातील कोल्हे, अटलगव्हाण, वरसाडे, पिंप्री, डांभुर्णी, भोजे, चिंचपुरे आदी गावांमध्ये रविवारी (ता. १३) रात्री बारा ते दोनदरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. वेचणीला असलेला कापूस, शेतात कापून पडलेले सोयाबीन, मका आदी पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले.

या भागात मंगळवार (ता. ८)पासून रोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. रविवारी (ता. १३) झालेल्या पावसाने संपूर्ण पावसाळ्यातील उच्चांक मोडला. परिसरातील सर्वच शेतांमध्ये पाणी साचले होते. मुरडेश्वरच्या डोंगररांगांतून उगम पावणाऱ्या बहुळा नदीला या वर्षातील सर्वांत मोठा पूर आला होता. पावसामुळे शेतकरी हताश झाला आहे. पिकांच्या लागवडीपासून ते रासायनिक खते, आंतरमशागत, मजुरी आदींवर केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशातच सततच्या पावसामुळे कापसाची प्रतही खालावली आहे. वेचणीची मजुरीही शेतकऱ्यांना अधिक द्यावी लागत असून, कापसाची कवडीमोल खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. आमदार किशोर पाटील यांनी शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT