DVSP Sunil Nandwalkar returning mobile phones to original owners. esakal
जळगाव

Jalgaon News : डीवायएसपी पथकाची सतर्कता, तत्परतेने 37 मोबाईल सापडले

Jalgaon : उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिसांच्या सतर्कतेने व तंत्रशोधक पद्धतीचा अवलंब केल्याने हरवलेले ३७ मोबाईल मिळून आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिसांच्या सतर्कतेने व तंत्रशोधक पद्धतीचा अवलंब केल्याने हरवलेले ३७ मोबाईल मिळून आले. सदर मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. सर्वसाधारणपणे मोबाईल हरवणे नित्याची बाब आहे. अगदी किरकोळ प्रमाणात मोबाईल सापडणे शक्य होते. बऱ्याचदा पोलिसदेखील प्रयत्न करीत नाहीत. (DYSP team vigilance found 37 mobile phones )

मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले. अमळनेर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी तंत्रज्ञ पोलिस उज्वल पाटील यांच्यावर मोबाईल शोधायची जबाबदारी टाकली. उज्वल पाटील यांनी तांत्रिक यंत्रणा वापरली. त्यात हरवलेले ३७ मोबाईल राजस्थान, गुजरात, नाशिक, पंढरपूर, अमरावती, मालेगाव, भुसावळ, जळगाव, धुळे आदी ठिकाणी असल्याचे शोधून काढले.

त्यानंतर तेथील पोलिसांशी संपर्क साधून त्या-त्या व्यक्तींकडून मोबाईल जप्त करण्यात आले. उज्वल पाटील, हितेश बेहरे यांनी विविध ठिकाणांहून मोबाईल परत आणले आणि मूळ मालकांशी संपर्क करून त्यांना परत देण्यात येत आहेत. नागरिकांनी आपले मोबाईल व मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवावेत, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल विकत घेऊ नये, असे आवाहन डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT