170 children were honored with the child in the educational adoption program by Bharari Foundation  esakal
जळगाव

Jalgaon News: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 170 पाल्यांना शैक्षणिक बळ! भरारी फाउंडेशन, वेगा केमिकल्सतर्फे दत्तक सोहळा

Jalgaon News : ३६ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी द गार्डियन्स फाउंडेशन व ठाण्याच्या विद्यार्थी विकास योजनातर्फे दत्तक घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील भरारी फाउंडेशन व वेगा केमिकल्स प्रा.लि.तर्फे जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या १७० पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व वार्षिक फीवाटप करण्यात आली. ३६ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी द गार्डियन्स फाउंडेशन व ठाण्याच्या विद्यार्थी विकास योजनातर्फे दत्तक घेण्यात येणार आहे. (Jalgaon Educational strength for 170 children of farmers who eneded life)

भरारी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकरी संवेदना’ या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे १० वे वर्ष असून, आतापर्यंत संस्थेने ६५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात झालेल्या कार्यक्रमात भालचंद्र पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपून शेतकरी आत्महत्या यासारख्या संवेदनशील बाबीवर काम करीत असलेल्या भरारी फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध स्वरूपाची मदत वेगा केलिकलतर्फे देण्याचे आश्वासन या वेळी त्यांनी दिले.

संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक रत्नाकर पाटील यांनी भविष्यात विद्यार्थी विकास योजनेतर्फे उच्च शिक्षणासाठी आर्थिक, तसेच इतर शैक्षणिक बाबींसाठी सहाय्य करणार असल्याचे सांगितले. या उपक्रमाला वेगा केमिकलचे भालचंद्र पाटील, जैन उद्योग समूह, उद्योगपती रजनीकांत कोठारी, डॉ. परेश दोशी, डॉ. पी. आर. चौधरी, मुकेश हसवानी, नंदलाल गादीया, बाळासाहेब सूर्यवंशी, लखीचंद जैन, आशिष भंडारी, विक्रम मुणोत यांनी सहकार्य केले. (latest marathi news)

जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, डॉ. अपर्णा भट, चित्रा चौधरी, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, अक्षय सोनवणे, नदीम काझी, सागर पगारीया, सचिन महाजन, अभिषेक बोरसे, नंदू बारी, शैलैंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती. फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. विनोद ढगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

R. Madhvan Parenting Tips: "मुलांना मोकळा वेळ देऊ नका!" आर. माधवनने दिल्या यशस्वी आणि शिस्तबद्ध मुलं घडवण्याच्या टिप्स

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Irregular Sleep Schedules: ८ तास झोपल्यानंतरही बिघडू शकतं का आरोग्य? जाणून घ्या झोपेचं योग्य वेळापत्रक का गरजेचं

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

SCROLL FOR NEXT