Livestock Census esakal
जळगाव

Jalgaon Livestock Census : सप्टेंबरमध्ये दुसऱ्यांदा ॲपपद्वारे पशुगणना; घरोघरी फिरणार प्रगणक

Livestock Census : पशुसंवर्धन विभागाकडून सप्टेंबर महिन्यापासून २१ व्या पशुगणनेला सुरवात केली जाणार आहे.

संजय पाटील

Jalgaon Livestock Census : पशुसंवर्धन विभागाकडून सप्टेंबर महिन्यापासून २१ व्या पशुगणनेला सुरवात केली जाणार आहे. गेल्या वेळी २०१९ मध्ये तालुक्यातील तब्बल एक लाख तीन हजार जनावरांची नोंदणी ऑनलाइन ॲपद्वारे प्रगणकांकडून करण्यात आली होती. आता त्या धर्तीवर दुसऱ्यांदा ॲपद्वारे पशुगणना केली जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी दिली. शासनाकडून दर पाच वर्षांनी संपूर्ण भारतात पशु गणना केली जाते. ( Enumerators will go door to door for second time in September through app for Livestock Census )

पशुगणनेच्या माध्यमातून मोठी जनावरे व लहान जनावरे यांची संख्या संकलित केली जाते. या संकलनाच्या माध्यमातून भविष्यात पशुंसाठी चारा, औषधोपचार याबाबत ध्येय धोरण जाहीर करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरत असते. त्यामुळे या पशुगणनेला विशेष महत्त्व आहे. पारोळा तालुक्यात राज्यस्तरीय १२ व जिल्हा परिषदेचे ५ असे १७ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. श्यामकांत पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी योगेश देशमुख व पशुधन पर्यवेक्षक डॉ. शांताराम पाटील हे पशुगणनेबाबत माहिती संकलनासाठी प्रगनकांना मार्गदर्शन करणार आहेत. (latest marathi news)

चौदा प्रगणकांकडून माहिती संकलन

शासनाकडून सप्टेंबर महिन्यात २१व्या पशुगणनेला सुरवात होणार असल्यामुळे यासाठी तालुक्याच्या पशुधनाची माहिती संकलन करण्यासाठी ग्रामीण भागासाठी १२ तर शहरी भागासाठी दोन अशा १४ प्रगणकांची नावे वरिष्ठांकडून पाठविली असून, त्या कामी चार पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मोठ्या पशुधनात गाय, म्हैस, बैल अशी ६९ हजार १०० तर लहान पशुधनात शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, घोडा कोंबड्या यासह पाळीव प्राण्यांची नोंद केली जाणार आहे.

पारोळा तालुक्यातील २०१९ चे पशुधन

गाय वर्ग- ४९,५३५, म्हैस वर्ग-१९, ५६५, मेंढ्या -२,८५६, शेळ्या -३१,२००, वराह -९१२, घोडे -३२ असे पशुधन २०१९ च्या पशुगणनेनुसार नोंद करण्यात आले आहेत.

''शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तालुक्याच्या पशुगणनेला सुरवात सप्टेंबर महिन्यापासून ‌होणार आहे. ही पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्याच्या कालावधीत होणार असून, पशुपालकांनी घरोघरी येणाऱ्या प्रगनकांना आपल्या पशुधनाची योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे. तालुक्यातील कोणतेही पशु गणनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.''- डॉ. योगेश देशमुख, पशुधन विकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT