Police team with stolen bikes and thieves. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दुचाकी लांबवणारी एरंडोलची टोळी अटकेत; चोरीच्या 8 दुचाकींसह शहर पोलिसांच्या जाळ्यात

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने जळगाव शहरातील दुचाकींची चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गजाआड केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलांच्या मदतीने जळगाव शहरातील दुचाकींची चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, उपअधीक्षक संदीप गावित यांच्या सूचनेवरून निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अमोल ठाकूर, भास्कर ठाकरे, सुधीर साळवे व योगेश पाटील यांना एक तरुण संशयास्पद दुचाकी घेऊन जाताना आढळून आला. ()

या पथकाने त्याला ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. पोलिस पथकाने शुभम भगवान चौधरी (वय २५), मोईन मुक्तार मणियार (वय १८), ओम सुरेश हटकर (वय १८, तिघे रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) यांना ताब्यात घेतले. पोलिसी पाहुणचार केल्यावर तिघा संशयितांनी शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली व आठ दुचाकी काढून दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Earthquake: कोयनेतील ‘त्या’ काळरात्रीला ५८ वर्षे पूर्ण! 'भूकंपाच्या आठवणी आजही कायम'; निसर्गाच्या उद्रेकामुळे शेकडोंनी गमावले होते प्राण..

Latest Marathi News Live Update : दापोलीत हुडहुडी; पारा ७.२ अंशांवर

Pune News : राज्य सहकारी बँकेत शिपाई, चालक भरतीही आयबीपीएसमार्फत

Sahyadri Tiger: 'ताडोबातील आणखी एक वाघीण सह्याद्रीत'; आईपाठोपाठ मुलीचेही स्थानांतर, चांदोलीच्या सोनरलीत वास्तव्य !

'TET' सक्तीचा नेमका आदेश काय? ११० पानांच्या आदेशावर शासन सुस्पष्ट परिपत्रक काढून दूर करणार संभ्रम; २०१० पूर्वीच्या शिक्षकांना दिलासा मिळू शकतो, पण...

SCROLL FOR NEXT