MSRTC Bus esakal
जळगाव

Jalgaon MSRTC News : एरंडोल डेपोची नांद्रा एसटी बससेवा बंद! अनेकांना फटका; सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Jalgaon News : बंद असलेली बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी या भागतील विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांद्रा (ता. पाचोरा) : एरंडोल आगारातील नांद्रा मुक्काम बस गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आखाजी व विविध शिकवणीसाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. म्हणून बंद असलेली बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी या भागतील विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी केली आहे. (Jalgaon Erandol Depot Nandra MSRTC Bus Service Closed)

दहावीच्या परीक्षा दिलेले विद्यार्थी उन्हाळी सुटीमधील शिकवणी, टाईपींगसह संगणकाच्या प्रशिक्षणासाठी शहरात जात आहेत. मात्र, बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना इतर खासगी वाहनांचा उपयोग करावा लागत आहे. शिवाय पाचोरा येथून सकाळी सव्वासातला एरंडोल येथे माहेजी-म्हसावद मार्गे जाणारी बससेवासुद्धा कित्येक दिवसांपासून बंद करण्यात आल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. पाचोरा आगारातील सकाळी सव्वासातची बस व एरंडोल आगाराची नांद्रा मुक्काम बससेवा पूर्ववत करण्याची मागणीही विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्रवाशी ग्रामस्थांनी केली आहे.

"निवडणुकीच्या कामांसाठी बसगाड्यांची मागणी आहे. त्यामुळे आमच्या आगारातील काही बसगाड्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. त्यातच काही बसगाड्या उपलब्ध नाहीत. शिवाय विद्यार्थांनाही उन्हाळ्याची सुट्टी आहे. त्यामुळे नांद्रा मुक्कामाची बस गेल्या महिनाभरापासून बंद आहे. निवडणुकीनंतर ती पूर्ववत करण्यात येईल."

-श्रीमती बागुल, आगार व्यवस्थापक, एरंडोल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT