Residents of the new settlements while giving a statement to District Magistrate Manish Kumar Gaikwad. esakal
जळगाव

Jalgaon Road Damage : रस्त्यांच्या समस्येवरून एरंडोलकर आक्रमक; नवीन वसाहतींमध्ये तत्काळ दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना निवेदन

Jalgaon News : नवीन वसाहतींमधील रस्त्यांवर सर्वत्र चिखल, खड्डे झाल्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन रस्त्यांची समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमधील रस्त्यांवर सर्वत्र चिखल, खड्डे झाल्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन रस्त्यांची समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. नवीन वसाहतींमधील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. (Erandol people aggressive over road problem)

शहरासह नवीन वसाहतींमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्यामुळे सर्वत्र रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर सर्वत्र चिखल, गारा निर्माण होऊन खड्डे पडल्यामुळे रहिवाशांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले असून, ठिकठीकाणी वाहने चिखलात फसत आहेत.

पालिका प्रशासनाकडे अनेकवेळा मागणी करून देखील या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे साने गुरुजी कॉलनी, विद्यानगर, अष्टविनायक कॉलनी, आनंदनगर, आदर्शनगर, गुरुकुल कॉलनी, ओमनगर, साईनगर यासह विविध वसाहतींमधील संतप्त झालेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.

नवीन वसाहतींमधील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी; अन्यथा रहिवासी रास्तारोको आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला. रस्त्यांवरील गारा, चिखल काढून खड्डे बुजवून रस्त्यांवर खडीचा कच टाकण्याची मागणी यावेळी रहिवाशांनी केली. सुमारे २५ ते ३० वर्षांपासून नवीन वसाहतींमधील रहिवासी रस्ते, गटारी, पथदिवे, स्वच्छता यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असून, पालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. (latest marathi news)

परिणामी, पाणी तुंबणे, डास होणे, दुर्गंधी पसरणे, मोकाट डुकरांचा मुक्तपणे संचार, अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. नवीन वसाहतींमधील रस्त्यांची समस्या दूर करण्याचे आश्वासन प्रांताधिकाऱ्यंनी दिले. या वेळी रवींद्र लाळगे, पंडित साळी, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, रघुनाथ कोठावदे, तुकाराम पाटील, दिनेश चव्हाण.

स्वप्नील सावंत, तुळशीराम पाटील, अनिल पाटील, पृथ्वीराज चव्हाण, भाईदास पाटील, कृष्णकांत चौधरी, नारायण बोरसे, राजेंद्र सोनार, गोरख चौधरी, दिलीप सूर्यवंशी, ॲड. दिनकर पाटील, मधुकर अहिरे, संतोष पाटील,अनिल वाणी, दिलीप सावंत, मधुकर अहिरे, आर. के. सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, अनिल सपकाळे, किरण पाटील यांच्यासह

रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल पालिका प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यांची कामे करताना अनेक अडचणी येत आहेत. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. नवीन वसाहतींमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पालिकेतर्फे नियोजन करण्यात येत आहे." - किरण देशमुख, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईतील रेल्वेट्रॅक पाण्याखाली, पावसाने शहर ठप्प! घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा...

'मला त्याचा 'तो' भाग खूप आवडतो' अभिनेत्रीला नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट करणं पडलं महागात, नेटकरी म्हणाले, 'हेच का संस्कार'

Mumbai : शिकायला लंडनला जायचं होतं, त्याआधीच बिझनेसमनच्या १७ वर्षीय लेकीनं संपवलं आयुष्य; २३ मजली इमारतीवरून मारली उडी

Rule 72 Explained: तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट होणार? Rule No. 72 सांगतोय तुमचं आर्थिक भविष्य

Dahi Handi 2025 Celebration: गो गो गोविंदा...! दहीहंडी उत्साहात साजरी करण्यासाठी 'या' सेफ्टी टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT