A newly constructed flyover on the railway line at Nadgaon in the taluka. esakal
जळगाव

Jalgaon News : रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण.. स्थानकांचे आधुनिकीकरण; स्थानकांचा ‘लूक’ बदलला

Jalgaon : दळणवळणाच्या सुविधा देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतात. दहा वर्षांपासून केंद्र सरकारने दळणवळणाच्या पायाभूत सुविधांवर जास्त फोकस केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दळणवळणाच्या सुविधा देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतात. दहा वर्षांपासून केंद्र सरकारने दळणवळणाच्या पायाभूत सुविधांवर जास्त फोकस केला. दहा वर्षांत महामार्गांच्या विस्तारासह रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण, नव्या रेल्वेमार्गांना मंजुरीसह प्रस्तावित मार्गांचे प्रत्यक्षात कामास प्रारंभ, रेल्वे उड्डाणपुलांची मालिका, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण अशा अनेक दृष्टीने सुविधा होत आहेत. ()

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातही रेल्वेशी संबंधित अनेक सुविधांचे नेटवर्क उभे राहिले आहे. या क्षेत्रात भुसावळसारखे मध्य रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन, त्याला जोडून जळगाव जंक्शन आहे. शिवाय भुसावळला विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयही स्थित आहे. यामुळे या विभागांतर्गत रेल्वे सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो.. त्यातून सुविधांचे जाळे निर्माण होते.

भुसावळ- मनमाड चौथी लाईन

भुसावळ- मुंबई रेल्वेमार्गावर भुसावळ ते मनमाड या दोन जंक्शनदरम्यान दुहेरी रेल्वेलाईन होती. मात्र, या मार्गावरील रेल्वेगाड्यांची प्रचंड वर्दळ पाहता ही लाईन पुरेशी नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भुसावळ- मनमाड दरम्यान तिसरी व चौथ्या लाईनच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. या टप्प्यात तिसऱ्या लाईनचे काम बऱ्यापैकी पूर्णत्वात येत असून भुसावळ- जळगाव रेल्वे स्थानकादरम्यान चौथ्या लाईनचे कामही सुरु आहे.

‘पीजी’ रेल्वेचे भाग्य उजळले

जिल्ह्यातील ब्रिटीश कालीन महत्त्वपूर्ण पाचोरा- जामनेर (पीजी) रेल्वे बंद पडण्याचा मार्गवर असताना खासदार रक्षा खडसेंच्या पाठपुराव्यामुळे ‘नॅरोगेज’चे ‘ब्रॉड गेज’मध्ये रुपांतर करुन हा मार्ग थेट मलकापूर- बोदवडपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पाचोरा- जामनेर- बोदवड अशा ८४.३४ किलोमीटरच्या टप्प्याचा ब्रॉडगेज करण्यासाठी ९५५ कोटींच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. (latest marathi news)

‘पीएम गतीशक्ती’ योजनेच्या बृहत आराखड्याच्या संस्थात्मक चौकटीअंतर्गत स्थापन केलेल्या नेटवर्क नियोजन गटाने परिक्षणाअंती पाचोरा- जामनेर गेज परिवर्तन व विस्तारीकरण याची शिफारस केली.

रेल्वे उड्डाणपुलांची मालिका

रावेर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणच्या रेल्वेमार्गांवर रेल्वेगेट होते. त्यामुळे दोन्हीकडील वाहतुकीचा खोळंबा व्हायचा. अशा रेल्वेगेटच्या ठिकाणी उड्डाणपूल आवश्‍यक बनले होते. वाहनांची वर्दळ असलेली अशी रेल्वेगेटची ठिकाणे निवडून त्याठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानाने निर्मित रेल्वे उड्डाणपुलांची कामे गेल्या दहा वर्षांत बऱ्यापैकी मार्गी लागली.

नाडगाव (ता. बोदवड) येथे (१६ कोटींचा अपेक्षित खर्च), रावेर तालुक्यातील निंभोरा येथील उड्डाणपूल (९ कोटी १२ लाख), रावेर तालुक्यातील सावदा- गाते येथील रेल्वे उड्डाणपूल (८कोटी ८७ लाख) या पुलांचा समावेश आहे. या पुलांचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा टळणार आहे. याशिवाय, रोड अंडर ब्रीज याअंतर्गतही कामे करण्यात आली आहेत. एकूणच गेल्या दहा वर्षांत रेल्वे विस्तारीकरण, विकासाच्या दृष्टीने ही उपलब्धी मोठी म्हणावी लागेल.

भुसावळ स्थानकाचे रुपडेच पालटले

भुसावळ रेल्वे जंक्शन हे मध्य रेल्वेमार्गावरील मोठे व सर्वांत महत्त्वाचे स्थानक आहे. आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रेल्वे यार्ड याच भुसावळ जंक्शननजीक आहे, त्यामुळेही त्याचे महत्त्व अधिक वाढते. या जंक्शनवरुन देशाच्या चारही दिशांना लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्यांचे आवागमन सुरु असते.

केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ या योजनेंतर्गत भुसावळ, मलकापूर, सावदा, रावेर व नांदुरा या स्थानकांचा समावेश करण्याच्या दृष्टीने रक्षा खडसेंनी सातत्याने पाठपुरावा केला. भुसावळ स्थानकावर प्रवाशांसाठी सर्वप्रकारच्या सोईसुविधा, आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सरकते जिने, लिफ्ट, इलेक्ट्रॉनिक झाडूद्वारे सफाई, दिव्यांगांसाठी व्हील चेअर, स्थानकाची स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, सुशोभीकरण या अद्ययावत सुविधांसह स्थानकांचे रुप पालटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : मंगळवेढा पोलिसांनी शोधलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT