Bribe Crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : विस्ताराधिकाऱ्यासह सहाय्यक लाखाची लाच घेताना ताब्यात

Bribe Crime : कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : चार कामांची वर्कऑर्डर काढून देण्यासाठी एक लाख ८० हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या येथील पंचायत समितीचे कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका ग्रामपंचायतींतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काँक्रिट व पेव्हर ब्लॉक बसविण्याची चार कामे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या मुलाला मिळाली होती. (Extension officer along with assistant arrested while taking bribe)

या चार कामांची वर्कऑर्डर मिळवून देतो. त्यासाठी विस्ताराधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांसह माझे अशी मिळून एक लाख ८० हजार रुपये इतकी लाच द्यावी लागेल, असे सांगितले. तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचत प्रतिबंधक विभागाला कळविल्यानंतर पथकाने सापळा रचला. त्यानुसार शुक्रवारी (ता. २०) कल्पेश बेलदार याला एक लाख रुपये रोख स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

या कारवाईनंतर ही रक्कम घेण्यासाठी मला विस्ताराधिकारी सुनील पाटील यांनी सांगितले होते, असा जबाब दिल्यावरून सुनील पाटील व कल्पेश बेलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT