Prakash Patil esakal
जळगाव

Jalgaon News : घुमावलला माजी सरपंचाची उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon : घुमावल खुर्द शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला बांधलेल्या दोरीच्या सहायाने गळफास घेत जीवनयात्रा संपविली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील घुमावल बुद्रूक येथील माजी सरपंच, भाजपचे माजी पदाधिकारी प्रकाश लक्ष्मण पाटील (वय ४४) यांनी घुमावल खुर्द शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला बांधलेल्या दोरीच्या सहायाने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी (ता.२०) सकाळी आठच्या सुमारास घडली. प्रकाश पाटील हे घुमावल बुद्रूक येथील घरून शनिवारी सकाळी सातच्या सुमारास बाहेर पडले. (extreme step taken by former sarpanch of Ghumaval )

परंतु, कामानिमित्त त्यांचे मोठे भाऊ रविकांत लक्ष्मण पाटील हे घुमावल खुर्द शिवारातील शेतात आले असताना त्यांना प्रकाश पाटील यांचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर नातेवाईकांनी प्रकाश पाटील यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉ. सुरेश पाटील यांनी मृत घोषित केले. (latest marathi news)

डॉ. पाटील यांच्या माहितीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकाश पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभावाचे असलेले प्रकाश पाटील यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Odisha Assam Floods: ओडिशा-आसाममध्ये पावसाचा हाहाकार; ७८ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांचा जीव धोक्यात

CWG26 India Medal Tally : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली? ऑस्ट्रेलिया शतकासह अव्वल, तर...

Latest Marathi News Live Update : राधानगरी धरण १०० टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता

Pune-Bengaluru Highway : सहा पदरीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह! मुरगूड रोडनंतर आता गांधी हॉस्पिटलजवळ राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT