Shop lined up in Subhash Chowk. esakal
जळगाव

Ramadan Festival : ‘रमजान’च्या स्वागतासाठी सजली बाजारपेठ; फैजपूर शहरात दुकानांची रेलचेल

Jalgaon News : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या ‘रमजान ईद’निमित्त खरेदीसाठी फैजपूर बाजारपेठ गजबजली आहे.

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या ‘रमजान ईद’निमित्त खरेदीसाठी फैजपूर बाजारपेठ गजबजली आहे. कापड दुकानांसह शिरखुरमासाठी लागणारे मावा पदार्थांची दुकाने शहराच्या प्रमुख बाजारपेठ असलेल्या सुभाष चौकात थाटली गेल्याने बाजारपेठेत रेलचेल सुरू आहे. अवघ्या चार दिवसांवर असलेल्या ‘पवित्र रमजान ईद’निमित्त ईदची ओळख ‘शिरखुरमा’ पदार्थ आहे. (Jalgaon Faizpur market is crowded for shopping on occasion of Ramadan Eid)

यासाठी लागणारी काजू, बदाम, खोपरा, खजूर, मनुख, चारोली आदी मावाच्या सर्व प्रकारातील वस्तूंची दुकाने व विविध प्रकारच्या सेवयांची दुकाने सालाबादप्रमाणे आजपासून बाजारपेठेत सज्ज झाली आहे. त्यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांची येथील बाजारपेठेत आणखी रेलचेल वाढली आहे. फैजपूर शहर, यावल व रावेर तालुक्यातील मध्यवर्ती आहे. शहराला व्यावसायिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले असून, या ठिकाणी कापड बाजारपेठ अस्तित्वात आली आहे.

कापड खरेदीला उत्साह

कापड, रेडिमेड कापड यासाठी नावलौकिक प्राप्त केले आहे. इतर मोठ्या शहराप्रमाणे येथेही चांगल्या दर्जाचे कापड ग्राहकांसाठी दुकानदार उपलब्ध करून देतात म्हणून कमी अवधीत येथील कापड बाजारपेठ नावारूपाला आली आहे. सामान्य गोरगरिबांना परवडेल अशा दरात कापड उपलब्ध असल्याने रावेर यावल तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर लोक कापड खरेदी करणे फैजपूर येथेच पसंत करतात.

त्यात आता लग्नसराई बरोबर ‘रमजान ईद’निमित्त गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज येथील बाजारपेठेत कापड खरेदीसाठी अलोट गर्दी आहे. या ठिकाणी असलेल्या रेडिमेड कापड दुकानामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. (latest marathi news)

चारोळीचे दर गगनाला

खोपरेचे दर १२० रुपये प्रति किलो तर काजू, बदाम, मनुका, खजूर यांचे दर प्रकार नुसार आहेत. यात चारोळीच्या दरात दुप्पटीने वाढ होऊन अडीच हजार रुपये प्रति किलो दर आहे. तसेच ईदनिमित्त सेवयांना तितकीच मागणी असते म्हणून बनारस फेणी, चुंबल अहमदाबादी, सुतर फेनी दीडशे रुपयाने सेवयांची विक्री होत आहे.

"आधीपेक्षा यंदा खोपरेचे शंभर रुपयांनी दर कमी झाले. मात्र चारोळ्याचे दर दुप्पट झाले आहे. दरवर्षाप्रमाणे काजू बदाम, खजूर, मनुका यांचे दर तेच आहे. ईदसाठी शिरखुरमासाठी लागणारे सुका मावाचे सर्वप्रकारचे पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे."- शेख जावेद शेख रफिक, मावा दुकानदार फैजपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT