drowning death esakal
जळगाव

Jalgaon News : वाळूमाफियांच्या खड्ड्यामुळे गिरणा नदीत शेतकऱ्याचा मृत्यू! वाढलेल्या प्रवाहाने घेतला बळी

Latest Jalgaon News : जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शासकीय रुग्णालयात मृतदेह रवाना केला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गिरणा नदीतून होणाऱ्या बेसुमार वाळू उपशामुळे पडलेले खड्डे अन्‌ अचानक पाणीपातळी वाढल्याने शेतकरी वाहून गेल्याची घटना बुधवारी (ता. २) सायंकाळी घडली. जितेंद्र शांताराम बाविस्कर (वय ३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. (Farmer death in Girna river)

जितेंद्र बाविस्कर आई-वडील आणि भावासोबत वास्तव्याला होता. शेती करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतातील कामे आटोपून जितेंद्र नेहमीच्या रस्त्याने घराकडे निघाला. गिरणा नदी ओलांडत असताना, अचानक पाणीपातळीत वाढ झाली. अंदाज चुकल्याने जितेंद्रचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नातेवाइकांनी त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. गुरुवारी सकाळी साडेदहाला जितेंद्र बाविस्करचा मृतदेह गिरणा नदीपात्रात तरंगताना आढळला. नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शासकीय रुग्णालयात मृतदेह रवाना केला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक अनिल मोरे तपास करीत आहेत. (latest marathi news)

गिरणा नदीपात्रालगत कानळदा गाव आहे. तेथून ग्रामस्थ वाळूचा उपसा करू देत नाहीत. वाळूमाफिया शेजारील गावालगत आणि नदीच्या दुसऱ्या काठावरून पोकलॅंड, जेसीबी लावून वर्षभर वाळूचे उत्खनन करतात. परिणामी, नदीपात्रात मोठमोठे खड्डे झाले आहेत.

पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नदीपात्रातील खड्डे पाण्याने भरतात. पुराच्या पाण्याने काहींची जागाच बदलते. परिणामी, उथळ पात्रात खड्डे मोठे होऊन जीवघेणे ठरतात. अशाच खड्ड्यांमुळे जितेंद्र बाविस्कर यांची गफलत होऊन जीव गेल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT