crop loan esala;
जळगाव

Jalgaon: साडेसहा हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार थकीत विम्याची रक्कम! कृषिमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतकरी संघटनेची बैठक

Agriculture News :याबाबत १६ जूनला कृषी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून केळी पीकविम्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : गेल्या दीड वर्षापासून थकीत जळगाव जिल्ह्यातील सहा हजार ६८६ केळी विमाधारक शेतकऱ्यांना केळी पीकविम्याची रक्कम देण्याचे आश्‍वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकरी व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत दिले. राज्याचे कृषी आयुक्तही बैठकीला उपस्थित होते. (Jalgaon Farmers will get overdue insurance amount on six half thousand)

केळी उत्पादकांना विम्याची थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी वेळोवेळी निदर्शने, मोर्चे व ठिय्या आंदोलने शेतकरी संघटनेने केली. याबाबत १६ जूनला कृषी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून केळी पीकविम्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती.

त्यानुसार १ ऑगस्टला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर कृषी आयुक्त व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. हवामानावर आधारित केळी फळपीक विमा २०२२-२३ मधील जवळपास सहा हजार ६८६ शेतकऱ्यांच्या प्रलंबित विषयावर कृषिमंत्री मुंडे यांच्याबरोबर चर्चा झाली.

शेतकऱ्यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दहा हजार ६१९ ना मंजूर प्रकरणांची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील एकूण केळी पीकविमा प्रस्तावात नामंजूर करण्यात आले. (latest marathi news)

प्रस्तावांतील बहुतांश केळी पिकाचे क्षेत्र हे चोपडा, यावल, रावेर, जळगाव व मुक्ताईनगर या तालुक्यांतील आहे, म्हणून तेथील दहा हजार शेतकऱ्यांचे विमा प्रस्तावांपैकी सहा हजार ६८६ शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय समितीकडे अपील दाखल केले होते.

त्या प्रस्तावात एमआर सॅकच्या २०२२च्या दहा टक्के रॅंडमली पद्धतीने इमेज घेऊन ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केळी असल्याचे वस्तुनिष्ठ पुरावे सादर केले आहेत, त्या शेतकऱ्यांना विम्याच्या लाभ मिळेल, असे कृषिमंत्री मुंडे यांनी यावेळी आश्वासित केले. या बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी संदीप पाटील, एस. बी. पाटील, किरण गुजर, सुनील पाटील (वाळकी), योगेश पाटील व केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT