Jalgaon fight between two prisoners Four policemen suspended  sakal
जळगाव

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील मारहाण प्रकरणी चार पोलिस निलंबित

खुनाच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्‍हा सामान्य रुग्णालयात कैदी वॉर्डात दाखल न्यायबंदीना थोड्याशा पैशांसाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. खुनाच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात एक एरंडोलचा माजी नगराध्यक्ष आहे. घडलेल्या प्रकारामुळे बंदोबस्तावर तैनात चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे.

कारागृहातील न्यायबंदी सतीश गायकवाड व एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन आजारपणाचे कारण करून जिल्‍हा रुग्णालयाच्या कैदी वॉर्डात आहेत. सोमवारी रात्री महाजन याची पत्नी त्याला भेटण्यासाठी बंदी वॉर्डात आली होती. सतीश गायकवाड याच्याही मुक्त भेटीगाठी सुरू असून, तो शौचास जाण्याच्या बहाण्याने वॉर्डातून बाहेर निघून त्याच्या टोळक्यासह रुग्णालयाच्या गच्चीवर भटकत होता.

परिणामी, गायकवाड सोबत वॉर्डात परतलेल्या दोघांनी महाजनवर टॉन्ट मारल्याने दोघांमध्ये वाद झाला. गायकवाडने फोन करून आखणी तरुणांना बोलावून घेत महाजनला बेदम झोडपून काढले. मारहाणीमुळे रुग्णालयात धावपळ उडाली. अखेर अतिरीक्त पोलिस बोलावून वाद मिटविण्यात आला होता. याप्रकरणी मंगळवारी जिल्‍हापेठ पेालिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या चौघांवर कारवाई

कैदी वॉर्डात बंदोबस्ताला असलेले राजेश पुरुषोत्तम कोळी, संदीप पंडितराव ठाकरे, किरण कोळी, पारस बाविस्कर या चौघांच्या चौकशीचे आदेश जिल्‍हा पोलिस अधीक्षकांनी दिले असून, तत्काळ प्रभावातून त्यांना निलंबीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Reshuffle: दिल्लीत मोठ्या हालचालींची चर्चा! राजनाथ सिंहांनी पद सोडल्यास पुढे काय? अमित शाह यांच्याबाबतही मोठे संकेत?

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या अनेक भागांत २४ तासांत १०० मिमीहून अधिक पाऊस; दिवसभरात जोर वाढणार

Raigad News: महाड-वरंध घाटात भीषण दरड कोसळली; महाड-पुणे मार्ग पूर्णपणे बंद, वाहनचालकांची मोठी गैरसोय!

Mumbai Rain: मुंबईत संततधार! पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट; शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार? महत्त्वाची अपडेट समोर

Explained : ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी Fixing, क्रोएशियावर अन्याय? चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या... VAR च्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT