District Magistrate Mahadev Khedkar, Tehsildar Rupesh Kumar Surana giving caste certificates to the protestors. esakal
जळगाव

Jalgaon News : अखेर टोकरे कोळी समाजाला मिळाले एसटी जात प्रमाणपत्र; अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण

Jalgaon : प्रांत कार्यालयाबाहेर सुरू असलेले टोकरे कोळी समाजाचे आंदोलन अखेर बाराव्या दिवशी मागे घेण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील प्रांत कार्यालयाबाहेर सुरू असलेले टोकरे कोळी समाजाचे आंदोलन अखेर बाराव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते आंदोलनकर्त्यांना ५१ एसटीचे जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. टोकरे कोळी समाजाला एसटी संवर्गातून जातीचे दाखले मिळावेत, यासाठी १५ जुलैपासून प्रांत कार्यालयाबाहेर बिऱ्हाड आंदोलन सुरू होते. (Finally Tokare Koli community got ST caste certificate to protester )

अमळनेर व चोपडा तालुक्यांतील आदिवासी कोळी समाजाच्या नागरिकांनी प्रांत कार्यालयाकडे टोकरे कोळी (अनुसूचित जमाती)चे दाखले जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्या अर्जांची दोन वेळेस तपासणी व सुनावणी झाली होती. त्या प्रकरणांना सबळ पुरावेही जोडण्यात आले होते. (latest marathi news)

अशा सर्वच प्रलंबित व नवीन ऑनलाइन दाखल होणाऱ्या अर्जांचा निकाल होऊन त्या सर्व अर्जदारांना टोकरे कोळी (एसटी)चे दाखले जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, या मागणीसाठी जगन्नाथ बाविस्कर, सुखदेव सोनवणे, शांताराम कोळी, हिलाल सैंदाणे, रामचंद्र सपकाळे, गोपाल देवराज, भीमराव कोळी यांच्यासह चोपडा, अमळनेर परिसरातील बांधव ठिय्या आंदोलनात सहभागी होते. अखेर प्रांताधिकारी खेडकर, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत प्रांत कार्यालयाकडे सबळ पुरावे जमा केलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या ५१ व्यक्तींना एसटी संवर्गांतर्गत जात प्रमाणपत्र वाटप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

"आता मी सिंगल पण आधी.." ब्रेकअपबद्दल रिंकूचा पहिल्यांदाच खुलासा ; "रिलेशनशिपची मला भीती वाटते.."

Surya Grahan 2026: फाल्गुन अमावस्या खास ठरणार! भारतात सूतक नसल्याने ‘या’ शुभ गोष्टी नक्की करा

SCROLL FOR NEXT