Airport  esakal
जळगाव

Jalgaon Airport : जळगावातून विमान उड्डाणासाठी 18 एप्रिलचा मुहूर्त; गोवा, हैद्राबादसाठी ‘टेक ऑफ’

Jalgaon Airport : विमानसेवेची जबाबदारी स्वीकारलेल्या ‘फ्लाय-९१’ने १८ एप्रिलचा मुहूर्त जाहीर करत वेळापत्रक व गोवा, हैद्राबादसाठी दरही निश्‍चित केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Airport : गेल्या काही वर्षांपासून विमानाच्या उड्डाणाची प्रतीक्षा आता संपणार आहे. त्यासाठी विमानसेवेची जबाबदारी स्वीकारलेल्या ‘फ्लाय-९१’ने १८ एप्रिलचा मुहूर्त जाहीर करत वेळापत्रक व गोवा, हैद्राबादसाठी दरही निश्‍चित केले आहेत. त्यामुळे आता जळगावातील व्यावसायिक, उद्योजकांसह राजकीय नेत्यांची सुविधा होणार आहे. जळगावात तयार झालेल्या विमानतळाचा शहराला व जिल्ह्याला कायमस्वरूपी उपयोग होणार की नाही, असा प्रश्‍न होता. (Flight from Jalgaon to start from 18th April)

विमानतळ सज्ज होऊनही विमानसेवा सुरू होत नव्हती. विमानतळावर नाईट लॅन्डींगची सुविधा व अन्य सुविधाही सज्ज करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारने ‘उडान’ योजनेंतर्गत ‘ट्रू जेट’च्या माध्यमातून ही सेवा सुरू झाली. मात्र, ती काही दिवसच चालली. ती बंद पडून काही दिवस गेले. नंतर पुन्हा एकदा काही महिन्यांसाठी सेवा सुरू झाली.

कोरोनानंतर ही बंद पडलेली सेवा नंतर सुरूच झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘फ्लाय-९१’ने सेवेची जबाबदारी घेतली आणि ही सेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली. (latest marathi news)

आता तिला मुहूर्तही मिळाला आहे. ‘फ्लाय-९१’ने १८ पासून सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार वेळापत्रक, दरही निश्‍चित केले आहेत.

असे आहे शेड्यूल व दर

जळगाव-गोवा : सोमवारी, बुधवारी, शनिवारी (दर १,९९१ पेक्षा जास्त)

हैद्राबाद-जळगाव-हैद्राबाद : सोमवारी, बुधवारी, शनिवारी (१,९९१ पेक्षा जास्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Price: सणासुदीत नागरिकांना दिलासा; गॅस सिलिंडर झाला स्वस्त, नवीन दर काय?

Mahadevi Elephant: अनंत अंबानीच्या लग्नात हत्तीण तीन दिवस एकाच ठिकाणी उभी... महादेवीचे देखील हाल होणार? पेटाकडे उत्तर आहे का?

Latest Marathi News Updates : कर्नाटकने आलमट्टी धरणाची उंची वाढवू नये - मुख्यमंत्री फडणवीस

Nagpur Crime: लुटेरी दुल्हन पोलिसांच्या जाळ्यात; गिट्टीखदान पोलिसांकडून अटक, डझनभर लोकांना अडकवून केली लूट

Nagpur News: १२ हजार घरांमध्ये आढळल्या डेंगी अळ्या; शहरात वाढत्या डेंगी, मलेरियाने मनपा सतर्क, ‘ब्रिडिंग चेकर्स’ सक्रिय

SCROLL FOR NEXT